स्थानिक

विना परवाना पोस्टरबाजी होणार कारवाई

कलम तीन प्रमाणे पोलीस ठाण्यात दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात येईल.

विना परवाना पोस्टरबाजी होणार कारवाई

कलम तीन प्रमाणे पोलीस ठाण्यात दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात येईल.

बारामती वार्तापत्र

बारामतीतील तमाम नागरिकांना विनंती करण्यात येत आहे की बारामती शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विकास कामे सुरू आहेत. शहराचे सुशोभिकरण होत आहे.

परंतु अनेक जाहिरातदार तसेच काही व्यक्ती रस्त्याच्या कडेला पोल ला पुलाच्या कठड्याला व बांधकामाच्या कॉंक्रीट ला रस्त्याच्या इलेक्ट्रिक पोल ला पोस्टर चिकटवत असतात पोस्टर चिकटवल्या मुळे त्याचे विद्रुपीकरण होते.

सदर पोस्टर लावताना कुणाचीही परवानगी घेतलेली नसते. असे अनेक पोस्टर निदर्शनास आल्यानंतर बारामती शहर पोलिसांनी त्यांना बोलून घेऊन सदर पोस्टर आज संध्याकाळपर्यंत काढण्यास सांगितले आहेत. त्यांनी ते काढण्यास सुरुवात केली आहे.

यापुढे असे पोस्टर कोणी लावल्यास महाराष्ट्र विद्रुपीकरण कायदा कलम तीन प्रमाणे पोलीस ठाण्यात दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात येईल. तरी यापुढे कोणीही या प्रकारे पोस्टर नगरपालिका हद्दीमध्ये लावू नयेत तसेच लावायचे असेल तर त्याची रीतसर परवानगी नगरपालिकेकडून घ्यावी.

अन्यथा लावणारे छापणारे व ज्यांच्या साठी लावलेले आहेत त्या सर्वांच्या वर गुन्हा दाखल होणार आहे. तरी यापुढे सर्वांनी नोंद घ्यावी.

Related Articles

Back to top button