श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचा कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे.
मी स्वतःला होम क्वारंटाइन केले आहे, माझी प्रकृती उत्तम आहे.
श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचा कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे.
मी स्वतःला होम क्वारंटाइन केले आहे, माझी प्रकृती उत्तम आहे.
या पार्श्वभूमीवर श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, मागील १५ दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी स्वतःला होम क्वारंटाइन करावे व त्यानंतर कोरोना चाचणी करून घ्यावी. नागरिकांनी महत्त्वाचे काम असेल तरच बाहेर पडावे. बाहेर पडल्यानंतर मास्क वापरून, सोशल डिस्टंसिंग चे पूर्णतः पालन करावे.
श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी केलेल्या आवाहनामध्ये पुढे असे म्हटले आहे की, मला कोरोना लक्षणे असल्याने मी स्वतः कोविड १९ टेस्ट केली असता ती पॉझीटीव्ह आली असल्याने, मी स्वतःला होम क्वारंटाइन केले आहे, माझी प्रकृती उत्तम आहे.
शहर व तालुक्यातील गेल्या १५ दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वतःला ७ दिवस होम क्वारंटाइन करावे व ८ व्या दिवशी कोविड १९ टेस्ट करुन घ्यावी, आपण होम क्वारंटाइन झाल्याचे फलटण शहरातील नागरिकांनी नगर पालिकेस आणि ग्रामीण भागातील ग्रामस्थांनी पंचायत समितीचे कार्यालयात कळवावे असे आवाहन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांनी केले आहे.