इंदापूर
श्री गणरायाने कोरोनाचे संकट दूर करावे -राजवर्धन पाटील.
कोरोनाच्या संकटाविषयी केली चिंता व्यक्त .
श्री गणरायाने कोरोनाचे संकट दूर करावे -राजवर्धन पाटील.
कोरोनाच्या संकटाविषयी केली चिंता व्यक्त .
इंदापूर:-प्रतिनिधी
श्री गणरायाने कोरोनाचे संकट दूर करून, मानवी जनजीवन पूर्ववत करावे,असे साकडे निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांनी सोमवारी (दि.31) घातले.
शहाजीनगर येथे निरा भिमा सहकारी साखर कारखान्यावरती गणेशोत्सवानिमित्त श्री गणेश मूर्तीची आरती संचालक राजवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आली.यावेळी कोरोनाच्या संकटाविषयी चिंता व्यक्त करून राजवर्धन पाटील यांनी सर्वांनी काटेकोरपणे काळजी घ्यावी,असे आवाहन केले.याप्रसंगी कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक सुधीर गेंगे-पाटील,अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.