माळेगाव साखर कारखान्याने २०० रू.प्रतिटन द्यावेत…अन्यथा आंदोलन करणार आजी – माजी संचालकांसह सभासदांची मागणी
माळेगाव साखर कारखान्याचा यंदाचा गाळप हंगाम यशस्वी रित्या पार पडला आहे.

माळेगाव साखर कारखान्याने २०० रू.प्रतिटन द्यावेत…अन्यथा आंदोलन करणार आजी – माजी संचालकांसह सभासदांची मागणी
माळेगाव साखर कारखान्याचा यंदाचा गाळप हंगाम यशस्वी रित्या पार पडला आहे.
बारामती वार्तापत्र
सध्या कोरोंना महामारिमुळे शेतकरी प्रचंड अडचणीत आले आहेत.ऊस उत्पादक शेतकरी सभासदांचा ऊस लागण हंगाम सुरू आहे.अशावेळी मशागतीसह इतर खर्चाला शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत,कारखान्याचा गाळप हंगाम संपून जवळपास दोन महिने होत आले आहेत,असे असताना प्रचलित नियमानुसार कांडे पेमेंट देणे गरजेचे आहे.तरी माळेगाव साखर कारखान्याने कांडे बिलासह एकूण २०० रुपये प्रतिटन ऊस उत्पादक शेतकरी सभासदांना तातडीने द्यावेत अन्यथा तीव्र आंदोलन तसेच अमरन उपोषण करण्याचा इशारा कारखान्याच्या आजी – माजी संचालकांसह सभासदांनी कारखाना कार्यकारी संचालक राजेंद्र जगताप यांच्याकडे निवेदनाद्वारे दिला आहे.यावेळी संचालक सुरेश खलाटे,राजेंद्र ढवाण पाटील,रामदास आटोळे,विलास देवकाते,लक्ष्मण जगताप,अविनाश गोफणे,तानाजी पोंदकुले,राजेंद्र बुरुंगले,हर्षल कोकरे,मधुकर मुळीक,राजेंद्र जाधव,सुनील वाघ,गजानन चव्हाण,शशिकांत खामागळ आदीसह शेतकरी सभासद उपस्थित होते. माळेगाव साखर कारखान्याचा यंदाचा गाळप हंगाम यशस्वी रित्या पार पडला आहे.विक्रमी गाळप झाले आहे.सत्तांतर झाल्यानंतर मागील वर्षी देखील कांडे बिल दिले नाही,विरोधात असताना याच सत्ताधारी संचालक मंडळातील अध्यक्षांसह संचालकांनी आदोलन करत सभासदाच्या न्याय हक्कासाठी आवाज उठवला होता,याची आठवण निवेदनात नमूद करून आता खरोखरीच ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत असताना तातडीने कांडे बिल १०० रुपये आणि उचल १०० रुपये असे एकूण २०० रुपये प्रतिटन सभासदांना द्यावेत अशी मागणी निवेदनात केली आहे.जर यावर तातडीने निर्णय घेतला गेला नाही तर तीव्र आदोलन करून अमरन उपोषणाचा इशारा निवेदनात दिला आहे. चौकट.. ट्रॅक्टर चालक डिझेल साठी पैसे मागतो.. सध्या डिझेल तसेच पेट्रोल चे दर गगनाला भिडले आहेत.अशावेळी शेतीमधील मशागत करण्यासाठी ट्रॅक्टर बोलावला तर संबधित ट्रॅक्टर चालक लागलीच डिझेल साठी पैसे मागतो,सदरचे पैसे देण्यासाठी देखील शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत.. सुरेश खलाटे ज्येष्ठ संचालक, माळेगाव साखर कारखाना चौकट…बी..बियाणे खते घेण्यास पैसे नाहीत.. कारखान्याच्या वतीने सवलतीच्या दरात सोयाबीनचे बियाणे दिले जाते,मात्र सध्याच्या परिस्थितीत शेतकरी अडचणीत असल्याने बियाणे तसेच तत्सम इतर खते घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत.. राजेंद्र ढवाण पाटील संचालक माळेगाव साखर कारखाना चौकट…आम्ही यापूर्वीच सत्ताधारी संचालक मंडळाला कांडे बिल देण्याची मागणी करून आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.मात्र कार्यकारी संचालकानी आम्हाला वेळ मागितली असून संचालक मंडळाच्या बैठकीत सदर निवेदन माडण्याचे आश्वासन दिल्याने तूर्तास उपोषण स्थगित केले आहे. रामदास आटोळे,विलास ऋषीकांत देवकाते माजी संचालक माळेगाव साखर कारखाना छायाचित्र: माळेगाव साखर कारखान्याने कांडे बिलासह २०० रुपये प्रतिटन द्यावेत असे निवेदन कारखाना कार्यकारी संचालकाना देताना मान्यवर