श्री संत शिरोमणी सावता माळी महाराज पुण्यतिथी सोहळा बारामती मध्ये साध्या पद्धतीने साजरा
मोजक्या समाज बांधवांच्या उपस्थित पुण्यतिथी सोहळा पार पडला

श्री संत शिरोमणी सावता माळी महाराज पुण्यतिथी सोहळा बारामती मध्ये साध्या पद्धतीने साजरा
मोजक्या समाज बांधवांच्या उपस्थित पुण्यतिथी सोहळा पार पडला
बारामती वार्तापत्र
श्री संत शिरोमणी सावतामाळी महाराज यांच्या ७२६ व्या पुण्यतिथी निमित्त श्री संत सावतामाळी पुण्यतिथी सोहळा समिती, कसबा, बारामती यांच्यावतीने प्रशासनाने सांगितलेल्या नियमाप्रमाणे तसेच सामजिक जबाबदारीची जाणीव ठेवून दरवर्षी होणारा मोठा उत्सव न करता मोजक्या समाज बांधवांच्या उपस्थितीत मूर्तीपूजन करण्यात आले. याप्रसंगी बारामती नगरीच्या नगराध्यक्षा सौ.पौर्णिमा ताई तावरे,नगरसेवक श्री राजेंद्र आबा बनकर,नगरसेवक श्री संतोष जगताप, रामचंद्र भाऊ बनकर, विजय आगम, दत्तात्रय गदादे, शंकर नाळे, शिवाजी जाधव, सागर जाधव, अभिजित झगडे, गणेश गायकवाड, सोनू लोणकर, पिंटू बनकर, रणधीर बनकर, समीर बनकर, चिऊशेठ जांजिरे, बबलू जाधव, विकी आगम, राहुल कुदळे,, जयंत शिंदे राजेंद्र जमदाडे प्रमोद जमदाडे तसेच समाज बांधव उपस्थित होते..