श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी श्री.पुरुषोत्तम रामराजे जगताप यांची तर व्हाईस चेअरमनपदी श्री.आनंदकुमार शांताराम होळकर यांची बिनविरोध निवड.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष संभाजी होळकर यांनी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या नावाची घोषणा केली.
श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी श्री.पुरुषोत्तम रामराजे जगताप यांची तर व्हाईस चेअरमनपदी श्री.आनंदकुमार शांताराम होळकर यांची बिनविरोध निवड.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष संभाजी होळकर यांनी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या नावाची घोषणा केली.
बारामती वार्तापत्र
श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी पुरुषोत्तम जगताप यांची तर उपाध्यक्षपदी अनंदकुमार होळकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
ऑक्टोबर महिन्यात सोमेश्वर कारखान्याची पंचवार्षिक निवडणुकीत पार पडली यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पुरुस्कृत सोमेश्वर विकास पॅनेलने निर्विवाद सत्ता स्थापन केली. यामध्ये भाजप पुरुस्कृत सोमेश्वर परिवर्तन पॅनेलला एकही जागा मिळवता आली नाही.
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवड नवनिर्वाचित संचालकांची बैठक आज प्रशासकीय इमारतीच्या जिजाऊ सभागृहात पार पडली. यावेळी बारामतीचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत अध्यक्षपदासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची नावे संचालक मंडळाकडे सुपूर्द केली.
पुरुषोत्तम जगताप यांना तिसऱ्यांदा सोमेश्वर कारखान्याच्या अध्यक्षपदाची संधी मिळाली आहे. तर दुसऱ्यांदा संचालक झालेले आनंदकुमार होळकर यांना प्रथमच उपाध्यक्षपदी काम करण्याची संधी मिळाली आहे.
त्यानंतर अध्यक्ष पदासाठी पुरुषोत्तम जगताप यांचे नाव संचालकांनी एक मताने सुचवले तर उपाध्यक्षपदासाठी आनंद कुमार होळकर यांचे नाव सुचविण्यात आले. निर्धारित वेळेत दोघांचे अर्ज आल्याने दोघांची निवड बिनविरोध झाल्याचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी जाहीर केले.
अध्यक्ष व उपाध्यक्षपद निवडीचे सर्व अधिकार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे असल्याने अजित पवार यांच्या सुचनेनुसार बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष संभाजी होळकर यांनी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या नावाची घोषणा केली. यावेळी माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ मनोज खोमणे, दूध संघाचे अध्यक्ष संदीप जगताप, संचालक कौस्तुभ चव्हाण, जिल्हा परिषद स्वीकृत सदस्य हनुमंत भापकर, पंचायत समिती सदस्य राहुल भापकर आदी मान्यवर उपस्थित होते.