श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या 60 व्या गळीत हंगामाचा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

धरणे पूर्ण क्षमतेने भरल्याने कॅनलला पाणी राहिल याची दक्षता घेण्यात येईल.

श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या 60 व्या गळीत हंगामाचा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

धरणे पूर्ण क्षमतेने भरल्याने कॅनलला पाणी राहिल याची दक्षता घेण्यात येईल.

बारामती वार्तापत्र

श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या 60 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी आमदार संजय जगताप, पंचायत समितीच्या सभापती नीता फरांदे, एकात्मिक विकास पुनर्विलोकन समितीचे अध्यक्ष संभाजी होळकर, कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप, व्हाईस चेअरमन शैलेश रासकर आदी उपस्थित होते.

यावेळी श्री.पवार म्हणाले, श्री सोमेश्वर कारखान्याने मागील वर्षी सभासदांना उच्चांकी भाव दिला आहे. यावर्षीचा हंगामही चांगला होईल यात शंका नाही. शेतकऱ्यांच्या कष्टाचे चिज होण्यासाठी त्यांना चांगला भाव मिळाला पाहिजे. जागतिक बाजारपेठेत साखरेची मागणी वाढत आहे त्यामुळे साखरेला चांगला भाव मिळेल.

मीडियाने आपल्या म्हणण्याचा ध चा मा करू नये म्हणूनही ते प्रयत्न करत असतात. आज तर त्यांनी आपल्या आयुष्यातील संस्मरणीय क्षणांची आठवण काढली. त्यांच्या लग्नाचा किस्साच अजितदादांनी सांगितलं.

निमित्त होतं दसऱ्याचं.सोमेश्वर कारखान्यात आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.

यावेळी त्यांनी आपल्या लग्नाचा किस्सा सांगितला. कारखान्याच्या समितीवर निवडून आलेल्यांमध्ये काहीजण कोरी पाटी आहेत. बरेचजण अनुभवीही आहेत. नवीन लोकांना खूप काही शिकता येतं. मला लग्नाआधी छत्रपती कारखान्यात संधी मिळाली… त्यामुळं मला लग्नात सोपं झालं… आमच्या घरचे सांगायचे आमचं पोरगं डायरेक्टर आहे… त्यामुळं पद्मसिंह पाटील यांनी बहीण दिलीय… असं अजितदादांनी सांगताच एकच खसखस पिकली.

सोमेश्वरच्या 90% सभासदांनी साथ दिली. सोमेश्वरच्या 152 गावातल्या सभासदांचे आभारी आहोत. मी म्हणालो होतो मतांचं ओझं टाका. त्यांनीही इतकं ओझं टाकलं की मी पार आडवाच व्हायची वेळ आली, असं अजितदादा म्हणताच एकच खसखस पिकली. मी 1990 पासून राजकारणात आहे. एवढी एकतर्फी निवडणुक पाहिली नाही. हे फक्त सोमेश्वरच्या कार्यक्षेत्रात होवू शकतं. सभासद हे कारखान्याचे मालक असतात. नवीन मुलं शिकलीत. त्यांची मदत घ्या. उसाला चांगला दर, कामगारांना योग्य पगार, तोडणी कामगारांना योग्य दर मिळत असताना कोणाला त्रास होण्याचं कारण नाही. राष्ट्रवादीकडे माळेगावची सूत्रे येण्यापूर्वी प्रचंड नुकसान झालं. अनेक ठिकाणी गळती झाली. मला जोपर्यंत तुमचा पाठींबा आहे तोवर मी कशातही कमी पडणार नाही. विरोधकांच्या ताब्यात असताना माळेगाव कारखान्यात सतत बिघाड झाली. साखरेचं उत्पादन खराब झालेलं होतं, असंही ते म्हणाले.

कारखाने ही सभासदांच्या पूर्वजांची संपत्ती

धरणांची पाणी स्थिती चांगली आहे. पाण्याचा काटकसरीने वापर करा. उन्हाळ्यातही कमी पडू नये असं पाण्याचं नियोजन केलंय. मागच्या सरकारने पाच टिएमसी पाणी दुसरीकडे वळवलं होतं. आपल्या सगळ्यांची वाट लागली असती. सरकार आल्यानंतर या पाण्याचं नियोजन केलंय. पाण्याचा शक्य तिथे काटकसरीने वापर आवश्यक आहे. ठिबकसह अन्य यंत्रणा वापरा. यावर्षी ब्राझीलमध्ये दुष्काळ आहे. साखरेचे दर जागतिक बाजारपेठेत चांगले आहेत. रसापासून इथेनॉल बनवण्याचा पर्याय किंवा अन्य पर्याय निवडू. सभासदांना अधिक पैसे मिळतील यावर भर द्या, असंही ते म्हणाले. अनेक कारखान्यांमध्ये कुटुंबात पदे दिली जातायत. चार चार पिढ्या त्या पदावर काम करण्याची परंपराच आहे. सहकारी कारखान्यात सभासदांचा अंकुश असलाच पाहिजे. कारखाने ही सभासदांच्या पूर्वजांची संपत्ती आहे, असंही त्यांनी सांगितलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!