संकटकाळात अतिक्रमणाची कारवाई चीड निर्माण करणारी आणि अन्यायकारक – हर्षवर्धन पाटील.
गोखळी, तरंगवाडी, अंथूर्णे आणि पिंपळे भागात घर आणि शेती पिकावर वन विभागाची कारवाई..

संकटकाळात अतिक्रमणाची कारवाई चीड निर्माण करणारी आणि अन्यायकारक – हर्षवर्धन पाटील.
गोखळी, तरंगवाडी, अंथूर्णे आणि पिंपळे भागात घर आणि शेती पिकावर वन विभागाची कारवाई..
इंदापूर :- (प्रतिनिधी) कोरोना सारखी महाभयंकर परिस्थिती, पाऊस यामुळे अधिकच भयभीत असणारी इंदापूर तालुक्याची जनता त्यातच कोणत्याही प्रकारची नोटीस अथवा सूचना न देता सरकारी अधिकाऱ्यांनी गोखळी, तरंगवाडी, अंथूर्णे आणि पिंपळे भागात घर आणि शेती पिकावर केलेली अतिक्रमणाची कारवाईने इंदापूर तालुक्यातील या गावातील जनता बेघर, भयभीत झाली असून त्यांचे संसार उध्वस्त करणे बरोबर नसून त्यांना मदत करायला कोणी तयार नाही ही बाब इंदापूर तालुक्याच्या जनतेसाठी गंभीर असल्याचे मत महाराष्ट्र राज्याचे माजी संसदीय व सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले.
हर्षवर्धन पाटील म्हणाले की,’ सध्या सर्वत्र कोरोना सारख्या महाभयंकर संकटाने थैमान घातले आहे. त्यातच सध्या पावसाळा सुरू आहे आणि हे अतिक्रमण वर्षानुवर्षाच्या आहे तरीसुद्धा सरकारी अधिकाऱ्यांनी या तालुक्यातील गावावर केलेली कारवाई अन्यायकारक आहे.
ज्या कायदेशीर गोष्टी असतील त्या शासकीय पातळीवर सामोपचाराने सोडविता आल्या असत्या आणि सद्य परिस्थिती एका वेगळ्या संकटाचे असताना आणि त्या विभागाचे प्रमुख या तालुक्यात असताना देखील लोकांच्या प्रपंचावर जेसीबी, पोकलेन सारख्या उपकरणाचा घाला घालून अगोदरच संकटात असणाऱ्या जनतेवर मानवी अधिकचे संकट निर्माण केल्याने या भागातील जनता पुढील अनेक प्रश्नांनी चक्रावली आहे.
याविषयी आपण वरिष्ठांशी पत्रव्यवहार करून त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय सरकारी दरबाराकडे आणणार आहोत.’
प्रशासन, प्रतिनिधी यांच्या हतबलता यामुळे जनता गोंधळली असून आपल्याला मदत करण्यास वाली नसेल तर आपले पुढे काय होणार यामुळे ती चिंतीत आहे.