संकट काळी बारामती करांची मदत म्हणजे पंढरी चा प्रसाद होय: अदिती तटकरे
रायगड येथे राज्यमंत्री अदिती तटकरे यांच्या कडे मदत सुपूर्द

संकट काळी बारामती करांची मदत म्हणजे पंढरी चा प्रसाद होय: अदिती तटकरे
रायगड येथे राज्यमंत्री अदिती तटकरे यांच्या कडे मदत सुपूर्द
बारामती वार्तापत्र
संकटकाळीं धावून जाणे हा बारामती करांचा खास गुण असून शरद पवार साहेब आमच्यासाठी पांडुरंग असून पूरग्रस्तांना आलेली बारामती करांची मदत म्हणजे पूरग्रस्तां साठी पंढरीचा प्रसाद होय अशी प्रतिक्रिया राज्यमंत्री व रायगड जिल्याच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांनी दिली.
नगरसेवक अतुल बालगुडे यांच्या वतीने रायगड जिल्यातील पूरग्रस्तांना अन्नधान्य,पाण्याच्या बाटल्या,कपडे आदी टेम्पो भरून वस्तू तटकरे यांच्या कडे सुपूर्द करण्यात आल्या या प्रसंगी तटकरे बोलत होत्या या वेळी रायगड ,महाड ,पोलादपूर चे राष्ट्रवादी चे पदाधिकारी व तहसीलदार महेश उके व राहुल वायसे,संग्राम खंडागळे,अमोल पवार ,तोहीत शेख व अतुल बालगुडे व उपस्तीत होते
25 जुलै रोजी सकाळी सात वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते देसाई इस्टेट मधून टेम्पो रायगड कडे रवाना करण्यात आला व सांयकाळी 6 वाजता रायगड ला मदत पोहच झाली.
शासकीय मदत नंतर वैयक्तिक ,खाजगी मदत इतक्या तत्परतेने दिल्याची ही पहिली घटना असून सदर मदत दिल्याबद्दल अदिती तटकरे यांनी समाधान व्यक्त करून बारामती करांचे आभार मानले.
या नंतर रोगराई पासून पुरग्रस्तांचे संरक्षण होणे साठी गोळ्या,औषधें,इंजेक्शन चा सुद्धा पुरवठा करू असे आश्वासन अतुल बालगुडे यांनी या वेळी दिले.
रायगड येथे राज्यमंत्री अदिती तटकरे यांच्या कडे मदत सुपूर्द