संतांचे विचारांचा प्रचार व प्रसार काळाची गरज: विठ्ठल कांगणे
रुई मध्ये त्रिदिनी अखंड हरिनाम सप्ताह

संतांचे विचारांचा प्रचार व प्रसार काळाची गरज: विठ्ठल कांगणे
रुई मध्ये त्रिदिनी अखंड हरिनाम सप्ताह
बारामती वार्तापत्र
संत भगवान बाबा व संत वामन भाऊ यांचे विचार बंधुभाव, समता व मानवता शिकवते. भारतीय संस्कृती मधील सर्व संत साहित्य जगाला मार्गदर्शक असून युवा पिढीने संतांचे विचारांचा कार्याचा प्रचार व प्रसार करावा असे मत युवा मार्गदर्शक विठ्ठल कांगणे यांनी व्यक्त केले.
रुई येथे शुक्रवार १७ जानेवारी पासून संत भगवान बाबा व संत वामन भाऊ यांच्या पुण्यतिथी निमित्त त्रिदिनी अखंड हरिनाम सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे या प्रसंगी विठ्ठल कांगणे मार्गदर्शन करीत होते.
या प्रसंगी पुणे जिल्हा राष्ट्रवादीचे सरचिटणीस अजिनाथ चौधर,मा. नगरसेवक सुरेखा चौधर, विष्णु चौधर, मा.सरपंच मच्छिंद्र चौधर, पोपटराव चौधर, हनुमंत चौधर, सोमनाथ चौधर, छगन पानसरे, बापू जगताप नानासो चौधर, मंथन कांबळे पांडुरंग चौधर, साईनाथ चौधर, नवनाथ चौधर, ह.भ. प मुकुंद चौधर,गणपत साळुंखे, गणपत सावंत, शशिकांत खाडे, दत्तात्रय वनवे ,भाऊसाहेब चौधर, रोहिदास चौधर, जनार्दन फाळके आदी मान्यवर उपस्तीत होते.
आत्याधुनिक तंत्रज्ञांच्या काळामध्ये संतांचे विचार घरोघरी पोहोचणे आवश्यक आहे व बाल वयात संस्कार होण्यासाठी अशा कार्यक्रमांची आवश्यकता असल्याचे प्रास्ताविक मध्ये प्रा अजिनाथ चौधर यांनी सांगितले.