संत गाडगेबाबा यांच्या जयंती निमित्ताने नगराध्यक्षा शहा यांनी घेतला स्वच्छता अभियानात सहभाग
इंदापूर बस स्थानकाच्या परिसरात हातात झाडू घेऊन केली स्वच्छता

संत गाडगेबाबा यांच्या जयंती निमित्ताने नगराध्यक्षा शहा यांनी घेतला स्वच्छता अभियानात सहभाग
इंदापूर बस स्थानकाच्या परिसरात हातात झाडू घेऊन केली स्वच्छता
इंदापूर : प्रतिनिधी
आज (दि.२३) रोजी स्वच्छ सर्वेक्षण २०२१ अंतर्गत व संत गाडगे महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून राबवण्यात आलेल्या स्वच्छता अभियानात इंदापूरच्या प्रथम नागरिक तथा नगराध्यक्षा अंकिता शहा यांनी स्वतः हातात झाडू घेऊन इंदापूर बस स्थानकाच्या परिसरामध्ये स्वच्छता करत सहभाग घेतला.
या स्वच्छता अभियानात इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा, आरोग्य विभाग समितीचे सभापती नगरसेवक अनिकेत वाघ,नगरसेवक प्रशांत शिताप तसेच गाळेधारक व इंदापूर नगर परिषद आरोग्य विभागाचे अधिकारी व सर्व कर्मचारी सहभागी होते.
यावेळी बोलताना नगराध्यक्षा अंकिता शहा म्हणाल्या की, संत गाडगेबाबा जसे गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला हे भजन गात कोणाचीही वाट न बघता जाईल तिथे स्वच्छता करून परिसर स्वच्छ ठेवत असत तसेच सर्व शहरवासीयांनी स्वच्छतेबाबत जागरूक राहून आपल्या घराची व परिसराची स्वच्छता केली पाहिजे.इंदापूर शहर स्वच्छ सुंदर होऊन आपल्या इंदापूर शहराला स्वच्छ सर्वेक्षण २०१९ मध्ये नामांकन मिळाले परंतु आपल्याला मानांकन मिळेल म्हणून स्वच्छता न करता आपले व आपल्या कुटुंबाचे स्वच्छतेमुळे आरोग्य चांगले राहील व आपले घर,परिसर त्याबरोबर शहर स्वच्छ राहील. त्यामुळे स्वच्छता केली पाहिजे
यावेळी आगार प्रमुख मनेर यांनी नगराध्यक्षा अंकिता शहा यांना एसटी स्टँड परिसर स्वच्छ राहण्यासाठी सदरील ठेकेदार यांना सक्त सूचना देऊन बस स्थानक व परिसराची स्वच्छता ठेवण्यासाठी सांगितले. यावेळी बस स्थानकाच्या परिसरातील स्वच्छता ठेवण्यासाठी सर्व गाळेधारकांना इंदापूर नगर परिषदेतर्फे डस्टबिनचे वाटप करण्यात आले.व गाळेधारकांनी दुकानातील कचरा उघड्यावर न टाकता ओला व सुका कचरा वेगळा-वेगळा करून घंटागाडीत टाकण्याच्या सूचना नगरपरिषदेकडून देण्यात आल्या. तसेच जर इथून पुढे कचरा टाकताना कोणी आढळल्यास नगर परिषदेकडून दंड आकारण्यात येईल असेही यावेळी सांगण्यात आले.
यावेळी स्वच्छता अभियानात सहभागी झालेल्या सर्वांचे युवा क्रांती प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा नगरसेवक प्रशांत शिताप यांनी सर्वांना गुलाब पुष्प देऊन त्यांचा सन्मान केला व आरोग्य विभाग समितीचे सभापती अनिकेत वाघ यांनी सर्वांना स्वच्छतेची व वसुंधरेची शपथ दिली.