संत गुलाब बाबा पालखी सोहळ्याचे साध्या पद्धतीने प्रस्थान.
इंदापूर:- सिद्धार्थ मखरे (तालुका प्रतिनिधी):- रेडा तालुका
इंदापूर येथील प्रसिद्ध देवस्थान संत गुलाब बाबा मंदिरातून,संत गुलाब बाबा पालखी सोहळ्याचे सालाबाद प्रमाणे व कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी फक्त मुख्य मंदिरात, सिद्धेश्वर संत गुलाब बाबा यांच्या पादुकांचे विधिवत पूजन करून गावच्या सरपंच द्रोपदा देवकर यांच्या हस्ते प्रस्थान करण्यात आले.
यावेळी संत गजानन महाराज,साईबाबा व दत्त यांच्या पूजनाने,तसेच संत गुलाब बाबा भजनी मंडळ रेडा यांच्या मधुर अभंग वाणीने,पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम असा गजर करीत,मानाचा अश्व पूजन करण्यात आला.तसेच पालखी रथाची बैलजोडी,विना पूजन,मानाचे चोपदार तुळशी पूजन यावेळी करण्यात आले.शासनाच्या नियमानुसार सोशल डिस्टेंसिंगचे तंतोतंत पालन करण्यात आले.मास्क तोंडाला लावून हरिनामाचा गजर करण्यात आला.
संत गुलाब बाबा संस्थान चे अध्यक्ष ॲड. तानाजीराव देवकर,निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक बबनराव देवकर,,माजी उपसरपंच भीमराव यादव,प्राध्यापक आत्माराम देवकर,नानासाहेब देवकर,तुकाराम जगदाळे तुकाराम देवकर,ह.भ.प उंबराव महाराज देवकर,ह.भ.प.अनिल महाराज मोहिते,अशोक महाराज मोहिते,सोमनाथ महाराज पोळ,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे इंदापूर तालुका अध्यक्ष नीळकंठ मोहिते,नामदेव भोसले,संतोष देवकर,ॲड.योगेश देवकर,सोमनाथ देवकर,धनंजय गायकवाड,यांच्यासह मानाचे पंचवीस वारकरी उपस्थित होते.
यावेळी संत गुलाब बाबा संस्थान चे अध्यक्ष अँँड.तानाजीराव देवकर म्हणाले की,जगभर कोरोना सारखा आजार पसरला असून,यावर्षी संत गुलाब बाबा यांचा पालखी सोहळा विस्तृत प्रमाणात क्षेत्र पंढरी दर्शनासाठी जाणार नाही.तरीदेखील परंपरा खंडित होऊ नये.म्हणून मंदिरातच पालखीचे प्रस्थान करून पादुका मंदिरातच राहणार आहेत.पुणे जिल्हाधिकारी व संबंधित विभागाकडे संत गुलाब बाबा यांच्या पालखी सोहळ्यातील पाच प्रतिनिधींना पादुका घेऊन दर्शनासाठी परवानगी मिळण्यासाठी अर्ज दाखल केला आहे.त्यामुळे दरवर्षी पालखी समवेत चालणाऱ्या वारकऱ्यांनी यंदा आपल्या राहत्या घरात बसूनच विठुरायाचे नामस्मरण करावे असे आव्हान संस्थानचे अध्यक्ष अँँड.तानाजीराव देवकर यांनी केले आहे.
रेडा (तालुका इंदापूर)येथील संत गुलाब बाबा पालखीचे मंदीरातच साधेपणाने प्रस्थान संपन्न.