पुणे

संभाजी भिडे यांचे पुन्हा एकदा खळबळजनक विधान, नवा वाद निर्माण होण्याची शक्यता!

”कोरोना कोरोना म्हणत सगळी प्रजा भंपक आणि बावळट बनत चालली आहे.

संभाजी भिडे यांचे पुन्हा एकदा खळबळजनक विधान, नवा वाद निर्माण होण्याची शक्यता!

”कोरोना कोरोना म्हणत सगळी प्रजा भंपक आणि बावळट बनत चालली आहे.

पुणे : प्रतिनिधी

आपल्या वेगवेगळ्या विधानामुळे कायम चर्चेत राहणारे शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे संभाजी भिडे गुरुजी यांनी पुन्हा एकदा एक वक्तव्य केलं आहे. संभाजी भिडे यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे आता नवा वाद उभा राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आपल्या विधानामुळे ते पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची दाट शक्यता आहे.

हिंदू-मुस्लिम समाजात तेढ निर्माण होईल, असं त्यांनी वक्तव्य केल्यानं भिडे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची दाट शक्यता आहे. छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान मास सध्या सर्वत्र पाळला जात असताना संभाजी भिडे कार्यकर्त्यांना मार्गदर्शनासाठी पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत.

नुकतेच त्यांनी वढू बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधी स्थळावर दर्शन घेतले. त्यानंतर शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा, निर्वी या गावात जाऊन त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. याच वेळी संभाजी भिडे यांनी त्यांच्या भाषणात हिंदू-मुस्लिम समाजात तेढ निर्माण होईल, असं वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यांच्या या नव्या वक्तव्यानं वाद उफाळून येण्याची शक्यता निर्माण झालीय. संभाजी भिडे यांनी यापूर्वी देखील वेगवेगळे वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

नेमकं काय म्हणाले संभाजी भिडे?

संभाजी भिडे म्हणाले, इस्लाम हा आपल्या भारताचा खरा शत्रू आहे. संभाजी महाराजांचं बलिदान म्हणजे हिंदुस्थानच्या अस्तित्वाला असलेले आव्हान दडलेलं आहे. संभाजी महाराज आणि औरंगजेब हे दोन व्यक्ती होते आणि त्यांच्यात वैर होतं म्हणून औरंगजेबाने त्यांना तुकडे-तुकडे करुन मारले नाही. तर यामागे औरंगजेबाच्या मनात असलेली इच्छा होती. संपूर्ण भारत देशाचे तुकडे तुकडे करुन हिंदु समाज संपवून टाकावा अशी त्याची इच्छा होती. या रागातूनच त्याने संभाजी राजेंना मारलं.

मेलेली मढी कशाला उकरून काढायची. आपण नव्या युगासोबत चालूया असे अनेकजण म्हणतात. असे म्हणारी नादान, नालायक आणि देशघातकी वृत्ती सुशिक्षित लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर आहे.

संभाजी राजे आज नाहीयेत आणि औरंगजेबही नाहीये. पण औरंगजेब पाकिस्तानच्या रुपाने, बांग्लादेशच्या रुपाने, गावांमध्ये वसलेल्या मुसलमानांच्या रुपाने शिल्लक आहे. आजही इस्लामच्या पोटतिडकीने औरंगजेबाने संभाजीराजेंना मारलं. तो इस्लाम हा आपल्या देशाचा खरा शत्रू आहे. हा इस्लाम आजही अनेक रुपात गावोगावी हिंदुस्थानात नांदतोय आणि हिंदुस्थानाच्या बाहेर नांदतोय. या इस्लामला त्याच पोटतिडकीने उत्तर देण्याची ताकद हिंदू समाजात असून उत्तर दिले पाहिजे असंही संभाजी भिडे म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram