संरक्षण क्षेत्राच्या जागतिक स्तरावरील समस्यांवर टीसी कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय वेबिनारचे आयोजन
तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय
संरक्षण क्षेत्राच्या जागतिक स्तरावरील समस्यांवर टीसी कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय वेबिनारचे आयोजन
तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय
बारामती वार्तापत्र
बारामतीमधील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयामध्ये संरक्षण क्षेत्रातील आव्हानांचा आढावा घेण्यासाठी ‘क्रायसीस ऑफ सिक्युरिटी चॅलेनजेस- अ ग्लोबल कन्सर्न’ आंतरराष्ट्रीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. महाविद्यालयातील संरक्षण आणि सामरिक शास्त्र विभागाच्या पुढाकाराने ही आंतरराष्ट्रीय वेबिनार 15-16 जानेवारी, 2021 दरम्यान होत आहे. लोकसंख्या आणि सुरक्षा संकट, दहशतवाद, सांस्कृतिक आक्रमण आणि राष्ट्रीय सुरक्षा, व्यापार युद्धाचे जगावर होणार परिणाम, हिंदी महासागराचे भुराजनीतिक महत्व, रासायनिक शस्त्राचा जागतिक सुरक्षेवर होणारा परिणाम यासारख्या विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.
संरक्षण क्षेत्रातल्या समस्या ग्लोबल असल्या तरी त्यांचे परिणाम लोकल पातळीपर्यंत जाणवतात, त्यामुळे आपले विचार आता ग्लोकल झाले पाहिजेत. अशा प्रकारच्या वेबिनारमुळे विद्यार्थ्यांच्या विचारांचा आवाका वाढण्यास मदत होते, त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी वेबिनार सहभाग घ्यावा असे आवाहन प्राचार्य डॉ. चंद्रशेखर मुरुमकर यांनी केले आहे.
वेबिनारच्या माध्यमातून जगभरामध्ये संरक्षण क्षेत्रात सुरु असलेल्या घडामोडी जाणून घेण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे अशी माहिती संरक्षण आणि सामरिक शास्त्र विभागप्रमुख प्रा. देवीदास भोसले यांनी दिली आहे. दोन दिवसीय वेबिनारच्या नोंदणीची लिंक महाविद्यालयाच्या वेबसाईटवर देण्यात आली आहे.
दोनदिवसीय बेविनार मध्ये नायजेरियातील नोवेना विद्यापीठचे प्रा.एनग्बोवाजी डॅनियल एन्ते, बांग्लादेश, ढाका येथील जगन्नाथ विद्यापीठाचे प्रा. डॉ.अरुण कुमार गोस्वामी, तसेच डॉ. कमांडर भुषण दिवाण, गुजरात सेंट्रल युनिवर्सिटीचे डॉ. संजय झा, जवाहरलाल नेहरू युनिवर्सिटीचे (जेएनयू), नवी दिल्ली येथील डॉ. लक्ष्मणकुमार बेहेरा, तसेच केरळ सेंट्रल युनिवर्सिटीचे प्रा.डॉ. जयप्रसाद विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.