सकारात्मक जीवन जगण्यासाठी मन स्थिर पाहिजे – व्याख्याते प्रशांत देशमुख
जीवनात यश अपयश आले तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुरंदरचा तह डोळ्यासमोर ठेवा..

सकारात्मक जीवन जगण्यासाठी मन स्थिर पाहिजे – व्याख्याते प्रशांत देशमुख
जीवनात यश अपयश आले तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुरंदरचा तह डोळ्यासमोर ठेवा..
इंदापूर प्रतिनिधी –
इंदापूरातील शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित मालोजीराजे व्याख्यानमालेतील “जगणं सुंदर आहे”या विषयावर त्यांनी प्रथम पुष्प गुंफले.व्याख्यानमालेचे उद्घाटन कामधेनू परिवाराचे मार्गदर्शक समाजभूषण डॉ.लक्ष्मणराव आसबे यांनी केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक देवराव लोकरे होते.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पुणे जिल्हा शिवसेना महिला प्रमुख सीमा कल्याणकर, इंदापूर नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष दिलीप वाघमारे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष ॲड.इनायतअली काझी उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रशांत देशमुख पुढे म्हणाले की , मनाला स्थिर करण्यासाठी योगा, मेडिटेशन, नामस्मरण केले पाहिजे. सुखी जीवनाचा पासवर्ड त्यांनी श्रोत्यांना सांगितला. माझी चूक झाली मला मान्य आहे, हे तू फारच छान केलेस, तुझं मत काय, एवढं कृपया करशील का, आभारी आहे, तसेच आपण हे करूयात का? किंवा आपण हे केले आहे. या गोष्टी आपण अंगीकारल्या की तर जगणं सुंदर आहे. ग.दि. माडगूळकर, कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या अनेक कविता त्यांनी सादर केल्या. युवकांनी रायगड ही प्रेरणा ठरवली पाहिजे.जीवनात यश अपयश आले तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुरंदरचा तह डोळ्यासमोर ठेवला पाहिजे तरच जगणं सोपं होईल.
या कार्यक्रमाप्रसंगी लक्ष्मणराव आसबे व देवराव लोकरे यांनी मनोगत व्यक्त केले.प्रास्तविक व्याख्यानमालेचे अध्यक्ष कैलास कदम यांनी केले.स्वागत कार्याध्यक्ष सुनील गलांडे व शरद झोळ यांनी केले.सुत्रसंचालन संतोष नरूटे यांनी तर आभार अमोल खराडे यांनी मानले.हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी योगेश गुंडेकर,दत्तराज जामदार,अनिकेत साठे, विशाल गलांडे,अमोल साठे, तुषार हराळे,सचिन जगताप,ओम जगताप, आदित्य कदम यांनी प्रयत्न केले.