
सचिन चव्हाण यांना राज्यस्तरीय स्पर्धेत दोन पुरस्कार
दोन पुरस्काराचे मानकरी ठरले
बारामती वार्तापत्र
महाराष्ट्र शासनाच्या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या शिक्षकांसाठी राज्यस्तरीय दर्जेदार व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत विद्या प्रतिष्ठान मराठी माध्यमिक शाळा बारामती येथील तंत्रस्नेही शिक्षक सचिन भगवान चव्हाण हे दोन पुरस्काराचे मानकरी ठरले.
इयत्ता ३ री ते ५ वी इंग्रजी या गटात प्रथम क्रमांक तर ६ वी ते ८ वी भाषा गटात द्वितीय क्रमांक पटकावला.पंचायत समिती बारामती येथे हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.
या प्रसंगी पंचायत समिती बारामती शिक्षणाधिकारी निलेश गवळी, डॉ.अनिल बागल गट विकास अधिकारी पं.समिती बारामती,श्रीमती बच्छाव जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पुणे,संजय जाधव ,नवनाथ कुचेकर इ.अधिकारी उपस्थित होते.
रोख रक्कम,सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते.या यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी तसेच शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश रामचंद्र यादव ,उपमुख्याध्यापक कोरे पी एम,पर्यवेक्षक रकटे एन बी,गोसावी एच आर तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.