सणसर येथे एका व्यक्तीची दुसऱ्याच्या घरात आत्महत्या
कारण अद्याप समजले नाही
बारामती वार्तापत्र
सणसर तालुका इंदापूर येथील रणवरे मळा जवळील नितीन काळे यांच्या बंगल्याच्या आवारात एका व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली मात्र घटनेचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही .
भरणेवाडी तालुका इंदापूर येथील अप्पाराव भरणे ,वय वर्ष चाळीस यांनी दुपारी दोन वाजता चे दरम्यान नितीन काळे यांच्या बंगल्याच्या शेजारील आवारात आत्महत्या केली या विषयीची माहिती नितीन काळे यांच्या कुटुंबीयांनी पोलीस स्टेशन ला दिली. नितीन काळे हे बारामती येथील बांधकाम व्यावसायिक आहेत त्यांचे रणवरे मळा येथे टोलेजंग बंगला आहे या बंगल्याच्या आवारातच आप्पाराव भरणे यांनी आत्महत्या केली.
मयत आप्पाराव भरणे व नितीन काळे हे एकमेकांचे जवळचे परिचित होते त्यामुळे ही आत्महत्या पैशाच्या कारणावरून झाली की अन्य याविषयी पोलीस तपास करत आहेत या घटनेचा आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करून पोस्टमार्टम करून या विषयाचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ए एस आय .प्रभाकर बनकर हे करीत आहेत
दरम्यान सणसर व परिसरात या घटनेने खळबळ उडाली आहे