सन 2020 या वर्षात संजय गांधी निराधार योजनेची 830 प्रकरणे मंजूर
880 अर्जाची छाननी करण्यात आली
बारामती वार्तापत्र
तहसिल कार्यालय बारामतीच्या संजय गांधी निराधार योजना शाखेतून सन 2020 या वर्षात कोव्हिड-19 सारख्या महामारीची परिस्थिती व लॉकडाऊन असतानांसुध्दा तहसिलदार विजय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संजय गांधी योजना समितच्या 7 बैठका घेण्यात आल्या.
सन 2020 या वर्षात 880 अर्जाची छाननी करण्यात आली. यामध्ये संजय गांधी निराधार योजनेचे 503 प्राप्त अर्जापैकी 487 मंजूर तर 16 अर्ज नामंजूर करण्यात आले. श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजनेचे 314 प्राप्त अर्जापैकी 285 अर्ज मंजूर तर 29 अर्ज नामंजूर करण्यात आले. इंदिरा गांधी राष्ट्रीय योजनेचे प्राप्तक 35 अर्जापैकी सर्वच अर्ज मंजूर करण्याआत आले. इंदिरा गांधी कुटूंब योजनेचे 28 प्राप्त अर्जापैकी 23 अर्ज मंजूर तर 5 अर्ज नामंजूर करण्यात आले.
नायब तहसिलदार महादेव भोसले, अव्वल कारकून सुरेश जराड, सर्व मंडल अधिकारी व तलाठी यांनी प्रकरणे शोधून काढण्यासाठी विशेष प्रयत्न केले.