समाजसेवेची प्रबळ इच्छाशक्ती ! राज्यमंत्री भरणेंनी आपल्या कृतीतून दाखवून दिली
हाताला सलाईन ची सुई घेऊन उतरले जनतेच्या सेवेत
समाजसेवेची प्रबळ इच्छाशक्ती ! राज्यमंत्री भरणेंनी आपल्या कृतीतून दाखवून दिली
हाताला सलाईन ची सुई घेऊन उतरले जनतेच्या सेवेत
इंदापूर : प्रतिनिधी
माणसांमध्ये समाजसेवेची प्रबळ इच्छाशक्ती असेल तर तो काहीही करू शकतो हे राज्यमंत्री दत्तात्रय भरणेंनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. मागील दोन दिवसांपासून आजारी असल्याकारणाने डॉक्टरांच्या सल्ल्याने मंत्री भरणे सलाईनवर आहेत.मात्र लोकप्रतिनिधी या नात्याने आपल्याकडे असणारी जबाबदारी पार पाडण्याच्या उद्देशाने व कार्यकर्त्यांचा ‘मामा’कडे सुनिश्चित कार्यक्रमास येण्याचा आग्रह पूर्ण करण्यासाठी सलाईनची सुई हातात घेऊन मंत्री भरणे जनतेच्या सेवेत उतरले आहेत.
शनिवारी (दि.६) इंदापूर तालुक्यातील मौजे रेडणी येथील बरकडे बंधूनी नव्याने सुरू केलेल्या किराणा व स्टेशनरीचे उद्घाटन,जंक्शन येथील ऋतिक मोबाईल शॉपीचे उद्घाटन तसेच रविवारी इंदापूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते अनिल पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिर,बाबा चौक येथील हॉटेल जगदंबाचे उद्घाटन,
एसीटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन,नवोदय विद्यालयात शिक्षक म्हणून निवड झालेले दत्ता सुर्वे यांचा सत्काराचा कार्यक्रम तसेच शहा कुटुंबाचे सांत्वन अशा विविध ठिकाणी भरणेंनी भेटी दिल्याने परिस्थिती काही असो आपण जनतेच्या सुखदुःखात आणि सेवेकरिता रात्रंदिवस तत्पर असल्याचे दाखवून दिले आहे.