इंदापूर

सरकारला जाग आणन्यासाठी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यानी मुख्यमंत्र्यांना पाठवली दुधाची किटली…

इंदापूर येथे दूध दर वाढी संदर्भात महायुतीच्या वतीने तहसीलदारांना निवेदनासह दिली दुधाची किटली.

सरकारला जाग आणन्यासाठी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यानी मुख्यमंत्र्यांना पाठवली दुधाची किटली…

इंदापूर येथे दूध दर वाढी संदर्भात महायुतीच्या वतीने तहसीलदारांना निवेदनासह दिली दुधाची किटली.

दूध दर वाढीसाठी राज्यभर होत आहे आंदोलन.

इंदापूर:- सिद्धार्थ मखरे ( तालुका प्रतिनिधी )
आज दि.20 जुलै रोजी इंदापूर येथे राज्याचे माजी संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील व त्यांच्या मित्र पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये दूध दरवाढीसंदर्भात तसेच विविध मागण्यांच्या निवेदनासह या वेळी दुधाने भरलेले केटली ही तहसीलदारांना देण्यात आली.

गायीच्या दुधाला प्रति लिटर १० रू. अनुदान, दुध भुकटी करीता प्रति किलो ५० रू.
अनुदान, शासनाकडून ३० रू. प्रति लिटरने दुधाची खरेदी व्हावी तसेच महाराष्ट्रातील शेतक-यांच्या संकटामध्ये दिवसेदिवस भर पडत आहे. बँकेकडून नाकारल्या जाणारा कर्ज पुरवठा, नकली सोयाबीन बियाणामुळे करावी लागलेली दुबार पेरणी, युरिया खताचा तुटवडा व काळा बाजार, कोकणातील शेतक-याचे वादळामुळे झालेले नुकसान, अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे पिकाचे झालेले नुकसान या विविध संकटामध्ये शासनाकडून शेतक-यांना कोणताही दिलासा प्राप्त झाला नाही. या संकटाच्या काळामध्ये दुधाचे भाव कमी झाल्याने दुध उत्पादक शेतक-यांची अवस्था दयनीय झाली आहे.

महाराष्ट्रामध्ये १ कोटी ४० लाख लिटर गायीचे दुध उत्पादित होते त्यापैकी ३५ लाख लिटर सहकारी संघाकडून खरेदी केल्या जाते. ९० लाख लिटर दुध खाजगीसंस्था व डेअरीच्या माध्यमातून विकत घेतले जाते. १५ लाख लिटर दुध शेतकरी स्वतः हॉटेल्स, ग्राहक यांना पुरवितो. शासकिय योजनेद्वारे फक्त १ लाख लिटर दुध खरेदी केले जाते.

या कोरोनाच्या लॉकडाउनच्या काळात दुधाच्या विक्रीमध्ये ३० टक्केपर्यंत घट झाली.
शहरातील हॉटेल्स, चहाची दुकाने बंद असल्यामुळे दुधाची मागणी घटली. आजच्या घडीला खाजगी संस्था व सहकारी दुध संघाकडून दुध १५ ते १६ रू. दराने खरेदी केली जात आहे.

त्यामुळे दुधाचा उत्पादन खर्च सुध्दा निघू शकत नाही. शासनाने १० लाख लिटर दुध २५ रू.
प्रति लिटर या भावाने खरेदी करण्याची घोषणा केली होती. परंतु प्रत्यक्षात ७ लाख लिटर दुध खरेदी केली जात आहे. काही ठराविक दुध संघाकडून शासन दुध विकत घेत आहे. इतर शेतक-यांना व दुध उत्पादकांना शासनाने वा-यावर सोडले आहे.
असे मुद्दे निवेदनात मांडले असून
गायीचे पवित्र दुध मंत्री मंडळातील सर्व सहका-यां करिता पाठवा म्हणत दुधाची भरलेली केटली तहसीलदार सोनाली मेटकरी यांच्या कडे सुपूर्द करून विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले.

यावेळी इंदापूर अर्बन बँकेचे चेअरमन भरत शहा, दूधगंगा दूध उत्पादक संघाचे चेअरमन मंगेश पाटील, रयत क्रांती संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष निलेश देवकर, शहराध्यक्ष शकिलभाई सय्यद, माजी नगराध्यक्ष अशोक इजगुडे,गटनेते कैलास कदम,दूधगंगाचे उपाध्यक्ष उत्तम जाधव, रा.स.प.चे जिल्हा उपाध्यक्ष किरण गोफणे,आर.पी.आय.चे पुणे जिल्हा संघटक सचिव शिवाजीराव मखरे, आर.पी.आय.चे तालुकाध्यक्ष संदीपानजी कडवळे,माऊली चवरे,गोपीचंद गलांडे,प्रकाश गाडकवाड आदी पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!