सरडेवाडी टोलनाक्यावर स्थानिकांना शंभर रुपयांचा महीना पास द्या;शिवसेनेची मागणी
अन्यथा टोल प्रशासनाच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार देणार

सरडेवाडी टोलनाक्यावर स्थानिकांना शंभर रुपयांचा महीना पास द्या;शिवसेनेची मागणी
अन्यथा टोल प्रशासनाच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार देणार
इंदापूर : प्रतिनिधी
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील इंदापूर नजीक असलेल्या सरडेवाडी येथील टोल नाक्यावर येथील स्थानिक लोकांना १०० रुपयात एक महिन्याचा पास मिळावा, या मागणीसाठी शिवसेना आक्रमक झाली आहे. त्या संदर्भात शिवसेनेने टोल प्रशासनाला निवेदन ही दिले असून ही मागणी त्वरीत पूर्ण करावी अन्यथा टोल प्रशासनाच्या विरोधात गुन्हे दाखल केले जातील असा इशारा इंदापूर तालुका शिवसेनेच्या वतीने करण्यात आला आहे.
या संदर्भात बोलताना शिवसेनेचे तालुकाध्यक्ष नितीन शिंदे म्हणाले की,पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाटस येथील टोल वरती स्थानिक लोकांना १०० रुपयात एक महिन्याचा पास देऊन वाहतुकीसाठी परवानगी देण्यात येते परंतु त्याच कंपनीच्या सरडेवाडी येथील टोल नाक्यावर २७५ रुपये आकारण्यात येतात. टोल कंपनी एक असताना तिथं वेगळा न्याय इथे वेगळा न्याय हे चालणार नाही.त्यामुळे सदरील मागणी इंदापूर तालुका शिवसेनेच्या वतीने टोल प्रशासनास निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.