क्राईम रिपोर्ट

सलग दुसऱ्या दिवशीही जुगार अड्डयावर गुन्हे शाखेचे पथकाने पत्त्याच्या कारवाई,बारामतीतील काहिंचा समावेश…१५ लाखाचा माल जप्त 

पुणे ग्रामीण एलसीबी शाखेकडून माळेगाव येथे जुगार अड्डयावर छापा टाकण्यात आला होता. या कारवाईत १५ लाख २२ हजार ८५० रुपयांचा मुद्देमालासह १६ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

सलग दुसऱ्या दिवशीही जुगार अड्डयावर गुन्हे शाखेचे पथकाने पत्त्याच्या कारवाई,बारामतीतील काहिंचा समावेश…१५ लाखाचा माल जप्त 

पुणे ग्रामीण एलसीबी शाखेकडून माळेगाव येथे जुगार अड्डयावर छापा टाकण्यात आला होता. या कारवाईत १५ लाख २२ हजार ८५० रुपयांचा मुद्देमालासह १६ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

क्राईम ; बारामती वार्तापत्र

बारामती तालुक्यातील माळेगाव येथे जुगार अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी तब्बल १५ लाख २२ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. . या कारवाईत १६ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. माळेगाव खुर्द येथील गोसावी वस्तीतील सोमनाथ सदाशिव गव्हाणे यांच्या शेत जमिनीमध्ये छापा टाकून ही कारवाई केली गेली. पत्र्याच्या शेडलगत असणाऱ्या मोकळ्या जागेत स्वतःच्या अर्थिक फायदयासाठी ३ पानी पत्त्याचा जुगार खेळत असताना पुणे ग्रामीण एलसीबी शाखेने छापा टाकला.

पुणे जिल्हयाचे पोलीस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी जिल्हयातील अवैध धंदयांवर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिलेले होते. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पथके नेमण्यात आलेली आहेत. त्यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल गोरे, सहा. पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय जगताप, विजय माळी, हनुमंत पासलकर, ज्ञानदेव क्षिरसागर, महेश गायकवाड, निलेश कदम, सुभाष राऊत, काशिनाथ राजापुरे, सागर चंद्रशेखर, गुरू गायकवाड, नितीन भोर, अभिजित एकशिंगे, प्रसन्न घाडगे, बाळासाहेब खडके यांचे पथक बारामती विभागात दिनांक १३ मे २०२१ रोजी पेट्रोलींग करीत असताना, त्यांना माळेगाव खुर्द ता.बारामती गोसावी वस्ती येथे सोमनाथ गव्हाणे यांचे शेतात मोठ्या प्रमाणात जुगार पत्त्यांचा क्लब चालू असल्याची माहिती मिळाली होती.

आरोपींना घेतले ताब्यात

सोमनाथ सदाशिव गव्हाणे (वय वर्षे ४२, रा.माळेगाव खुर्द ता.बारामती), रमेश शंकर गायकवाड (वय वर्षे ४०, रा.एस.टी.स्टॅड जवळ, बारामती), राजु शंकर जोगदंड (वय वर्षे ४०,रा.शालीमार चौक, दौंड),अनिश विनायक मोरे (वय वर्षे ३१, रा.आमराई बारामती), संतोष दिनकर रोकडे (वय वर्षे ४५ रा.सासपडे ता.जि.सातारा),अनिल बाळासाहेब माने (वय वर्षे ४५ रा.सासपडे ता.जि.सातारा), राजु शंकर गायकवाड (वय वर्षे ४० रा.एस.टी.स्टॅड समोर, बारामती), कुलदीप बाळासाहेब जगताप (वय वर्षे ३२ रा.सांगवी ता.बारामती), महादेव आण्णा मासाळ (वय वर्षे ५८ रा.मासाळवाडी लोणीभापकर, ता.बारामती), श्रीकांत श्रीनिवास उगले (वय वर्षे ३४ रा.सासपडे ता.जि.सातारा), विजय बाबुराव मोरे (वय वर्षे ४८ रा.कसबा बारामती), फैयाज युनुस मुल्ला (वय वर्षे ३१ रा.बुधवार पेठ फलटण), संतोष किसन शिंदे (वय वर्षे ४२ रा.परंदवाडी ता.फलटण), शेलार (वय वर्षे ४९ रा.,बारामती), विजय सुरेश देशमुख (वय वर्षे १९ रा.आमराई बारामती), विक्रांत अशोक अवधुते (वय वर्षे २४ रा.चंद्रमणी नगर, बारामती) यांना ताब्यात घेतले असून १६ आरोपी विरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम ४ व ५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे

सदर कारवाईत विविध पक्षाचे राजकीय पदाधिकारी बरोबरच शासकीय कर्मचारी,तर आपले नाव पोलिसांच्या यादीतून काढण्यासाठी अनेकांनी अनेक प्रयत्न करूनही पोलिसांनी कारवाईत कोणालाही दाद न दिल्याने स्वत:ला प्रतिष्ठित समजणाऱ्या पुढाऱ्यांचा चांगलाच हिरमोड झाला आहे.

त्याप्रमाणे सदर पथकाने वेशांतर करून माळेगाव खुर्द ता.बारामती गोसावी वस्ती येथील सोमनाथ सदाशिव गव्हाणे याचे शेतात चालणारे पत्त्याचे क्लबवर सापळा रचून अचानकपणे छापा टाकून तेथे पत्त्याचा जुगार खेळत असताना मिळून आलेले.

तेथे त्यांचेकडे व पत्त्याचे डावात मिळून आलेली १३,९५०/- रुपये रोख रक्कम, १,०१,०००/- रु.चे ११ मोबाईल, एक स्कार्पिओ, एक इर्टीगा, ४ मोटरसायकल अशी १४,००,०००/- रु. ची वाहने व ७,९००/- रु.चे जुगाराचे साहित्य असा एकूण १५,२२,८५०/- (पंधरा लाख बावीस हजार आठशे पन्नास) रुपये किंमतीचा माल जप्त केलेला आहे. जुगार खेळताना मिळून आलेले १६ आरोपी विरुध्द बारामती तालुका पोलीस स्टेशनला महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम ४ व ५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. ताब्यात घेतलेले आरोपी व जप्त मुद्देमाल बारामती तालुका पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आलेला आहे. पुढील अधिक तपास बारामती तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण व माळेगाव दूरक्षेत्राचे सहा. पोलीस निरीक्षक एम. एच. विधाते हे करीत आहेत..

सदरची कारवाई श्री.डॉ अभिनव देशमुख पोलीस अधिक्षक सो , श्री.मिलींद मोहीते अप्पर पोलीस अधिक्षक शो, श्री.नारायण शिसगावकर उपविभागीय अधिकारी सो,श्री महेश ढवाण पोलीस निरीक्षक बारामती तालुका पोलीस स्टेशन.श्री.पद्माकर घनवट सो.पोलीस निरीक्षक, रथा.गु.शाखा, सहा.पोलीस निरीक्षक महेश विधाते,श्री.अमोल गोरे, पोलीस उप निरीक्षक दत्तात्रय जगताप – सहा. पोलीस उप निरीक्षकविजय माळी, सहा.पोलीस उप निरीक्षक,पो.हवा./३२२/महेश गायकवाड,पो.हवा./२६५/निलेश कदम,पो.हवा./१९७०/ सुभाष राऊत,पो.हवा./७९३/ हनुमंत पासलक,पो.हवा./३०५६ / काशिनाथ राजापुरे,पोहवा/१७७४ गायकवाड,पो.ना./७९९/सागर चंद्रशेखर, पो.जा. /१९२९/गुरू गायकवाड,पो.ना./१९२८/नितीन भोर,पो.ना./१८५२ / अभिजित एकशिंगे, पो.कॉ./४४६/प्रसन्ना घाडगे,पो.कॉ.(२५८६/बाळासाहेब खडके,पोकॉ/३२ जाधव यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!