स्थानिक

सहा महिन्यात 14 गुन्हे करणाऱ्या लोखंडे टोळीच्या मुसक्या आवळल्या

पोलिसांवर केला होता गोळीबार

सहा महिन्यात 14 गुन्हे करणाऱ्या लोखंडे टोळीच्या मुसक्या आवळल्या

पोलिसांवर केला होता गोळीबार

बारामती वार्तापत्र
पोलीसांच्या वेषात येवून पिस्टलचा धाक दाखवून, गोळीबार करून गुन्हा करणारी लोखंडे टोळी पुणे ग्रामीण पोलीसांकडून जेरबंद करण्यात यश आले आहे दि. ०६ ऑगस्ट रोजी राजगड पो.स्टे.हद्दीतील कापुरहोळ येथील ,संजय किसन निकम यांचे बालाजी ज्वेलर्स या सराफी दुकानामध्ये ५ आरोपी आले तेव्हा त्यांचेपैकी १ आरोपी हा पोलीस उप निरीक्षक, १ आरोपी पोलीस नाईक, २ खाजगी व १ आरोपी असल्याचे भासविले तसेच बनावट पोलीस गणवेशात आलेल्या आरोपींनी तुम्ही चोरांकडून ७ ग्रॅम सोने घेतले आहे ते सोने परत देता का, आमचेसोबत पुण्याला येता असे म्हणून फिर्यादीला हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून दुकानातील ३४.५ तोळे सोन्याचे दागिने, १ मोबाईल फोन असा एकुण रू. १७,३२,०००/- किंमतीचा मुद्देमाल दरोडा टाकून चोरून नेला होता तसेच नागरीकांना आरोपींचा संशय आल्यानंतर लोक त्यांना पकडण्यास गेले असता आरोपींनी नागरीकांचे दिशेने गोळीबार करून जिवे ठार माण्याचा प्रयत्न केला होता.

त्याबाबत राजगड पो.स्टे. येथे गु.रजि.नं.५०९/२०२०, भा.दं.वि.कलम ३९५,३९७,३०७,१७०,१७१, आर्मस् अॅक्ट कलम ३,२५ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

दि. ०८ जुलै रोजी जेजुरी पो.स्टे. हद्दीतील निरा गावातील भैरवनाथ एजन्सी चितळे शॉपी येथील दुकानातून पाण्याचे बाटली मागण्याचा बहाणा करून चार अनोळखी इसमानी फिर्यादीचे डोकयास रिव्हॉल्व्हर लावून दम देऊन फिर्यादीची सोन्याची चैन व सोन्याची अंगठी, रोख रक्कम व मोबाईल असा रु. ९५,०००/- किंमतीचा माल जबरीने चोरून स्विफट कारमधून पळून गेलेबाबत जेजुरी पो.स्टे. येथे गु.रजि.नं. २५६/२०२०, भा.दं.वि.कलम ३९२,३४, आर्मस् अॅक्ट कलम ३,२५ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

तसेच वडगाव निंबाळकर पो.स्टे. हद्दीत दि.२६ आक्टोंबर रोजी संध्या. १७.३० वा.चे सुमारास पळशी येथील सराफी व्यवसायिक श्री. अमर रंगनाथ कुलथे यांच्या अमर ज्वेलर्स दुकान बंद करून विक्रीसाठीचे दागिने मोटार सायकलवरून घेवून घरी जाताना ३ अज्ञात आरोपींनी बजाज पल्सर मोटार सायकलवरून येऊन फिर्यादीस गाडी बाजूस घेण्यास सांगितले व फिर्यादीचे तोंडावर मिरची पावडर टाकून फिर्यादीचे मोटार सायलकला लाथ मारून खाली पाडून फिर्यादीचे ताब्यातील ११ तोळे सोने व १० किलो चांदी अशी रू. ११,६५,०००/- किंमतीचे दागिन्यांची बॅक जबरीने पळवून नेली होती त्याबाबत वडगाव निंबाळकर पो.स्टे.गु. रजि.नं. ४९८/२०२०, भा.दं.वि.कलम ३९२,३४ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. तसेच जेजुरी पो.स्टे.गु.रजि.नं. ३२३/२०२०, भा.दं.वि.कलम ४५७,३८० या गुन्हयामध्ये आरोपींनी दि. २३ सप्टेंबर रोजी निरा गावचे हद्दीतील अमेझॉन कंपनीचे स्टोअर फोडून त्यातील डी.व्ही.आर. ३ मोबाईल फोन, रोख रक्कम असा एकुण रू.७७,४९६/- किंमतीचा मुद्देमाल घरफोडी चोरी करून नेला होता.

सदरचे गुन्हे हे गंभीर स्वरूपाचे असल्याने मा. पोलीस अधीक्षक श्री. अभिनव देशमुख सो, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. मिलींद मोहीते सो., उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. नारायण शिरगांवकर, बारामती विभाग, श्री. धनंजय पाटील, भोर विभाग यांनी पोलीस निरीक्षक श्री. पद्माकर घनवट, स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण यांना गुन्हयातील मुख्य आरोपीना तात्काळ अटक करण्याबाबत सुचना दिल्या होत्या त्याप्रमाणे पो.नि.पद्माकर घनवट यांनी स्था.गु.शाखा, पुणे ग्रा. येथील पो. स.ई.श्री.शिवाजी ननवरे, श्री. अमोल गोरे, वडगाव निंबाळकर पो.स्टे.कडील स.पो.नि.श्री. सोमनाथ लांडे, पो. स.ई.शेलार, पो.स.ई.कवितके, सहा.फौज. दत्तात्रय गिरीमकर, शब्बीर पठाण, पो.हवा.चंद्रकांत झेंडे, उमाकांत कुंजीर, अनिल काळे, रविराज कोकरे, पो.ना.राजू मोमीन, जनार्दन शेळके, मंगेश थिगळे, अजीत भुजबळ, अभिजीत एकशिंगे, पो.कॉ. अमोल शेडगे, मंगेश भगत, बाळासाहेब खडके, धिरज जाधव, खान, सिताफ, मारकड, भुजबळ, खोमणे, सानप, जाधव, जैनक, चेतन पाटील, सुनिल कोळी, पो.कॉ.दगडु विरकर, अक्षय जावळे, समाधान नाईकनवरे यांचे पथक तयार करून त्या पथकाचे मार्फतीने संमातर तपास सुरू केला.

दीडशे किमी अंतरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले

तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने आरोपींचा वावर असणाऱ्या साधारणपणे १५० कि.मी.परिसरातील २०० सी.सी.टी.व्ही.कॅमेरे तपासून आरोपींची तांत्रिक विश्लेषण व गोपनीय बातमीदारामार्फत बातमी काढून तपास केला होता परंतु आरोपी हे सराईत व रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्यामुळे पोलीसांनी पकडू नये म्हणून काळजी घेत होते परंतु नेमलेल्या स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस पथकास तांत्रिक विश्लेषण व गोपनीय बातमीदाराकडून बातमी मिळाली की, ग…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!