सांगवी शाळेतील मुलांना मिळणार रोबोटिक्सचे शिक्षण
त्या शाळेतील मुलांना या शिक्षणाचा लाभ मिळणार आहे.

सांगवी शाळेतील मुलांना मिळणार रोबोटिक्सचे शिक्षण
त्या शाळेतील मुलांना या शिक्षणाचा लाभ मिळणार आहे.
बारामती वार्तापत्र
रोबोटिक्सचे शिक्षण देणारी जिल्हा परिषदेची तालुक्यातील पहिलीच शाळा ठरणार.
सांगवी : येथील जिल्हा परिषदेच्या शाळेला समग्र शिक्षा अभियान या उपक्रमातून रोबोटिक्स चे सुमारे दोन लाख रुपयांचे साहित्य आज उपलब्ध झाले आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून म्हणजे जून २०२२ पासून येथील इयत्ता पाचवी ते आठवीच्या मुलांना मोफत रोबोटिक्सचे शिक्षण दिले जाणार असून रोबोटिक्सचे शिक्षण देणारी सांगवीची शाळा जिल्हा परिषदेची बारामती तालुक्यातील पहिलीच शाळा ठरणार आहे.
राज्य शासनाने ज्या शाळांची आदर्श शाळा म्हणून निवड केलेली आहे त्या शाळेतील मुलांना या शिक्षणाचा लाभ मिळणार आहे. या माध्यमातून मुलांच्या अंगी असलेल्या सृजनशीलता,कल्पकता,व नवनिर्माण क्षमतेचा विकास होणार असून भविष्यातील इंजिनीयर, डॉक्टर व संशोधक या शाळेतून घडण्यासाठी या उपक्रमाची मोलाची मदत होणार आहे. सांगवी शाळेत यापूर्वीच कोडींगचे शिक्षण सुरू झालेले आहे. दोन महिन्यात मुलांनी कोडींगच्या मदतीने विविध ॲनिमेशन, गेम तसेच ट्रॅफिक सिग्नल सारखे दैनंदिन व्यवहारात उपयोगी पडणारे प्रकल्प तयार केले आहेत.
खेड्यापाड्यातील सर्वसामान्यांच्या गुणवंत मुलांच्या व्यक्तिमत्वाला पैलू पाडण्याचे काम यानिमित्ताने घडत आहे. बदलत्या काळात काळानुरूप आवश्यक असलेले भविष्यवेधी शिक्षण या निमित्ताने गोरगरिबांच्या मुलांपर्यंत पोहचत आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेची आता खऱ्या अर्थाने मॉडर्न शिक्षणाच्या दृष्टीने वाटचाल सुरू आहे.
बारामती तालुक्याचे भाग्यविधाते व राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार यांच्या संकल्पनेतून एक स्वप्नवत शाळा या सांगवी गावांमध्ये उदयास आली आहे. खरोखरच या शाळेत शिक्षण घेणारे विद्यार्थी, शिकविणारे शिक्षक आणि शाळेशी संबंधित सर्वच घटक निश्चितपणे खूप नशीबवान आहेत.
ये तो बस झाॅंकी है …