साखर आयुक्तांच्या हस्ते नीरा-भीमा कारखान्याच्या 1 लाख 1 व्या साखर पोत्याचे पूजन
कारखान्याची केली पाहणी
साखर आयुक्तांच्या हस्ते नीरा-भीमा कारखान्याच्या 1 लाख 1 व्या साखर पोत्याचे पूजन
कारखान्याची केली पाहणी
बारामती वार्तापत्र
शहाजीनगर येथील निरा भीमा सहकारी साखर कारखान्याच्या चालू सन 2020-21 च्या हंगामातील उत्पादित 1लाख 1 व्या साखर पोत्याचे पूजन राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड व वंदना गायकवाड या उभयतांच्या हस्ते आणि कारखान्याचे संस्थापक, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे उपस्थितीमध्ये मंगळवारी (दि.17) सायंकाळी करण्यात आले. तत्पूर्वी साखर आयुक्तांनी कारखान्याची पाहणी केली.
या पोती पूजन कार्यक्रमानंतर कारखान्याच्या एकूण कामकाजाचे, प्रगतीचे व चालू गळीत हंगामातील उद्दिष्टांचे प्र.कार्यकारी संचालक सुधीर गेंगे पाटील यांनी साखर आयुक्तांपुढे सादरीकरण केले. यावेळी मार्गदर्शन करताना शेखर गायकवाड यांनी कारखान्याच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले व अधिकारी वर्गाला सूचनाही केल्या.तसेच त्यांनी भविष्यकाळात इथेनॉल साखर कारखानदारीला आधार देईल असे भाष्य केले.कारखानदारीतील प्रत्येक घटकाने साखर उद्योग संदर्भात दररोज अपडेट राहिले पाहिजे असे आवाहनही साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी केले. याप्रसंगी हर्षवर्धन पाटील यांनी कारखान्याच्या कामकाजाचा आढावा घेतला तसेच साखर उद्योगापुढील आव्हाने व संधी आणि साखर उद्योगाक्षेत्राच्या सद्य:स्थितीचा भाषणात उहापोह केला. यावेळी चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, उपाध्यक्ष कांतीलाल झगडे, विलासराव वाघमोडे, उदयसिंह पाटील, राजवर्धन पाटील, कृष्णाजी यादव, दत्तात्रय शिर्के, दत्तू सवासे, प्रतापराव पाटील, हरिदास घोगरे, दादासाहेब घोगरे, संजय बोडके, प्रकाश मोहिते, मच्छिंद्र वीर, बबनराव देवकर, भागवत गोरे, चंद्रकांत भोसले, संगिता पोळ, जबीन जामदार अधिकारी उपस्थित होते.