
सागर पिसे यांची अभियंतापदी निवड
आई-वडिलांनी मोलमजुरी करून मुलांना शिकवले
इंदापूर; प्रतिनिधी
इंदापूरातील सागर गोविंद पिसे यांची सहाय्यक अभियंता महापारेषण येथे सहाय्यक अभियंतापदी निवड झाली आहे.
सागर पिसे त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. सागरचे प्राथमिक शिक्षण बेडशिंगे येथे, तर विद्यालयीन शिक्षण श्री हनुमान विद्यालय अवसरी, तसेच शंभु महादेव विद्यालय दगडवाडी या ठिकाणी झाले. त्यानंतर कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण वर्धमान महाविद्यालय वालचंदनगर येथे पूर्ण केले. पुढे त्याने इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ही पदवी इंदापूर येथील एस. बी. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथून प्राप्त केली.
यामध्ये त्याचे आई-वडील गोविंद व अनिता पिसे यांनी मोलमजुरी करून आपल्या मुलांना शिकवले. पदवीनंतरच्या शिक्षणानंतर सागर याने पुणे येथे अभ्यास करत स्वतःचा खर्च भागवण्यासाठी खासगी कंपनीत पार्सल बॉय म्हणून काम केले.
दिवसभर अभ्यासिकेत व त्यानंतर पार्सलचे काम सागर करत होता.