आपला जिल्हा

साडे चार कोटींच्या सिगारेटचा मालाची चोरी.

वडगाव पोलिस ठाण्यात १३ जणांविरोधात गुन्हा ७ जण ताब्यात.

साडे चार कोटींच्या सिगारेटचा मालाची चोरी.

वडगाव पोलिस ठाण्यात १३ जणांविरोधात गुन्हा ७ जण ताब्यात,

बारामती : वार्तापत्र बारामती तालुक्यातील सुपा- मोरगाव मार्गावरून चाललेल्या ट्रकचालकाला शस्त्राचा धाक दाखवत सिगारेटने भरलेला ट्रक पळवून नेल्या प्रकरणी १३ जणांवर वडगाव निंबाळकर पोलिस गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी ७ जण ताब्यात घेतले आहेत. बुधवार ता. २४ रोजी हा प्रकार घडला. याबाबत झाकीर सुकामेव हुसेन ( रा. माचा, ता. किसनगडवास, जि . अलवर, राज्यस्थान) या ट्रक चालकाने फिर्याद दिली.

YouTube player

हुसेन हे कपूर डिझेल गॅरेज प्रा. लि. कंपनीमध्ये आयशर ट्रक (एनएल ०१, एल- ४३३९) चालवतात रांजणगाव एमआयडीसीतील आयटीसी सिगारेट कंपनीशी या ट्रान्सपोर्टचा माल वाहतूक करार केला आहे. बुधवार ता. २४ रोजी हुसेन यांनी सिगारेटचा माल भरुन ते हुबळीकडे निघाले. न्हावरा, केडगाव वरुन ते सुप्याला येत पुढे मोरगाव बाजूकडे निघाले असताना अन्य एका ट्रकने त्यांना अडवत त्यांच्या ट्रकला आपला ट्रक आडवा घातला. पाचजणानी त्यांच्या ट्रकमध्ये येत शस्त्राचा धाक दाखवत त्यांना बाजूला करत ट्रकचा ताबा घेतला. हुसेन यांचे हातपाय बांधण्यात आले. डोळ्यांवर पट्टी बांधण्यात आली. दुसऱ्या एका ट्रकमध्ये त्यांना मागील हौदात बसवण्यात आले. माढा तालुक्यात टेंभुर्णीजवळ कंदर या गावी त्यांच्याकडील ३५०० रुपये जबरीने काढून घेत एका मक्याच्या शेतात त्यांना सोडण्यात आले. सुमारे चार ते पाच तास ट्रकमधून त्यांना फिरवले जात होते.
दरम्यान बुधवारी रात्री पुणे-नगर रस्त्यावर शिरूर जवळ पोलिसांनी थरारक पाठलाग करून ट्रक पकडला अंधाराचा फायदा घेऊन आरोपी उसाच्या शेतात लपून बसले होते यातील सात जणांना गुरुवारी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने पकडून गजाआड केले यामध्ये शिरूर पोलिसांची भूमिका महत्त्वाची ठरली.
या घटनेत दरोडेखोरांनी ४ कोटी ६१ लाख ८८ हजार ८२० रूपयांच्या सिगारेटसह ३ हजार ५०० रूपये रोख आणि १० लाखांचा ट्रक पळवून नेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान या दरोड्याचा पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने तपास करत दरोडेखोरांना अटक केली असल्याचे वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी सांगितले. सदर गुन्ह्यात १३ जणांवर गुन्हा दाखल केला असून सात जण ताब्यात घेतले आहेत सर्व जण मध्यप्रदेश मधील आहेत. सुशील राजन झाला, मनोज राजाराम सिसोदिया, मनोज केसरसिंग गुडेन, दिनेश वासुदेव झाला, सतीश अंतरसिंग झाला, कल्याणसिंग सदृलसींग चौहान, ओम प्रकाश कृष्णा कृष्णा झाला अशी ताब्यात घेतलेल्या ची नावे नावे आहेत.
अटक केलेले सात जण आंतरराज्य टोळीतील दरोडेखोर असून त्यांच्याविरुद्ध कर्नाटक पश्चिम बंगाल हरियाणा उत्तर प्रदेश आंध्र प्रदेश व ओडिशा या राज्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत या टोळीकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!