सामाजिक भान ठेवत इंडसइंड मिडिया कंपनीतर्फे गरजुंना जीवनावश्यक वस्तुंचे वाटप
सामाजिक बांधीलकी म्हणून वाटप: सुनील सस्ते.
सामाजिक भान ठेवत इंडसइंड मिडिया कंपनीतर्फे गरजुंना जीवनावश्यक वस्तुंचे वाटप.
सामाजिक बांधीलकी म्हणून वाटप: सुनील सस्ते.
बारामती(वार्ताहर): सामाजिक भान व जाण जपत गरजू ना जीवनावश्यक वस्तू चे वाटप केले असल्याचे विरोधी पक्ष नेते सुनील सस्ते यांनी सांगितले.
लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर तालुका प्रशासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत इंडसइंड मिडिया ॲण्ड कम्युनिकेशन प्रा.लि.अंधेरी मुंबई या कंपनीने गरजु लोकांना जीवनावश्यक वस्तुचे वाटप केले.
यावेळी उपविभागीय अधिकारी श्री.दादासाहेब कांबळे, तहसिलदार विजय पाटील, विरोधी पक्षनेते सुनिल सस्ते, नगरसेवक विष्णुपंत चौधर,मीलन पाटील सोहब ,संतोष गोस्वामी सोहब, शाकिर बागवान,दत्तात्रय बर्गे इ. मान्यवर उपस्थित होते. सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न कंपनीने केल्याने प्रशासनाच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले.
साखर,स्वा,पोहे एक किलो, तेल अर्धा तर एक मास्क असे ८५० किट देण्यात आले.