सायन्स ऑलम्पियाडमध्ये दर्शन कवीतके यास सुवर्णपदक
यशाबद्दल शाळा व्यवस्थापक समिती व शिक्षकांकडून तोंडभरून कौतुक

सायन्स ऑलम्पियाडमध्ये दर्शन कवीतके यास सुवर्णपदक
यशाबद्दल शाळा व्यवस्थापक समिती व शिक्षकांकडून तोंडभरून कौतुक
इंदापूर : प्रतिनिधी
रयत शिक्षण संस्थेच्या सौ.कस्तुराबाई श्रीपती कदम माध्यमिक व ज्युनियर कॉलेजमधील इयत्ता दहावी मधील दर्शन कवितके या विद्यार्थ्याने नॅशनल सायन्स ओलंपियाड स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले आहे.यामुळे शाळा व्यवस्थापक समिती व शिक्षकांकडून दर्शन कवीतके याचा सोमवारी ( दि.३० ) सत्कार करून तोंडभरून कौतुक करण्यात आले.
सन २०२० मध्ये सायन्स ओलंपियाड फौंडेशन मार्फत ही स्पर्धा परीक्षा घेण्यात आली. या स्पर्धेत विद्यालयातील दहा विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यापैकी दर्शन कवितके या विद्यार्थ्याने सुवर्ण पदकास गवसणी घातली. त्याच्या यशाबद्दल विद्यालयाचे प्राचार्य रामचंद्र पाटील, शाळा समिती सदस्य प्रदीप गारटकर, डॉ. श्रेणिक शहा, डॉ.लहू कदम, पर्यवेक्षक विजय शिंदे तसेच शाळा व्यस्थापन समिती, पालक शिक्षक संघ सदस्यांनी अभिनंदन केले. या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना विद्यालयातील विज्ञान शिक्षक अंकुश फुले, अश्विनी भिसे,अर्चना अनारसे व बाबासाहेब साळुंके यांनी मार्गदर्शन केले होते.