सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये कोरोना नियमांचे पालन करा – उपमुख्यमंत्री अजित पवार
पुण्यातील बैठकीत केल्या सूचना
सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये कोरोना नियमांचे पालन करा – उपमुख्यमंत्री अजित पवार
पुण्यातील बैठकीत केल्या सूचना
बारामती वार्तापत्र
कोरोना विषाणू ला प्रतिबंध करण्यात सर्व यंत्रणा प्रयत्न करत आहेत कोरोना च्या नव्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर गाफील राहून चालणार नाही सर्वांनी खबरदारी घ्यावी लागणार आहेत व त्या पद्धतीने नियोजन करावे अशा सूचना उपमुख्यमंत्र्यांनी आज पुण्यात विधान भवन येथे बैठकीत अधिकाऱ्यांना केल्या
परदेशातून प्रवास करून आलेल्या नागरिकांची तपासणी करून त्यांच्यावर लक्ष ठेवावे जनतेने मास्कचा वापर सोशल डिस्टंसिंग ठेवावे शासनाने लोक डाऊन मधून काही प्रमाणात शिथिलता दिली तरीही करणाचा अजूनही बिमोड झालेला नाही त्यामुळे नागरिकांनीही ही दक्षता घ्यावी व सर्व नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे असे त्यांनी सांगितले
जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांनी सांगितले की ब्रिटनमध्ये कोरोनाविषाणूचा नवीन प्रकार आढळल्यामुळे प्रशासन काटेकोर दक्षता घेत आहे. अशा पद्धतीच्या सूचना प्रशासनाने सर्वांना दिलेल्या आहेत.
या कार्यक्रमासाठी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलमताई गोरे, खासदार गिरीश बापट ,आमदार माधुरी ताई मिसाळ ,आमदार चेतन तुपे ,आमदार सुनील टिंगरे ,आमदार सिद्धार्थ शिरोळे ,तसेच विभागीय आयुक्त सौरभ राव ,ससून रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी एस चोक्कलिंगम ,पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रमकुमार, पिंपरी-चिंचवडचे आयुक्त श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, पिंपरी चिंचवड चे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश ,पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल, ससून चे अधिष्ठाता डॉ मुरलीधर तांबे, जिल्हा टास्क फोर्स चे अध्यक्ष डॉ डी बी कदम ,आरोग्य विभागाचे डॉ सुभाष साळुंखे ,यांच्यासह अधिकारी उपस्थित होते