सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे बारामती-मोरगाव रस्त्यावरील अपघातात वाढ;निष्काळजी ठेकेदारा विरोधात राजे ग्रुपचे अनोखे आंदोलन
दोन दिवसांपूर्वीच मोरगाव रोड माळवाडी नजीक पेट्रोल पंपासमोर माझ्या जवळच्य. सहकाऱ्यांचा मोठा अपघात झाला होता.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे बारामती-मोरगाव रस्त्यावरील अपघातात वाढ;निष्काळजी ठेकेदारा विरोधात राजे ग्रुपचे अनोखे आंदोलन
दोन दिवसांपूर्वीच मोरगाव रोड माळवाडी नजीक पेट्रोल पंपासमोर माझ्या जवळच्य. सहकाऱ्यांचा मोठा अपघात झाला होता.
बारामती वार्तापत्र
बारामती मोरगाव रस्त्याचे सध्या मोठ्या प्रमाणावर काम चालू आहे.मात्र हे काम चालू असताना त्या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांसाठी तेथे ठेकेदारा मार्फत कोणत्याही प्रकारचे सूचना फलक लावले नसल्यामुळे त्या रस्त्यावरील अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे.त्यामुळेच आता इथून पुढचे अपघात रोखण्यासाठी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधून घेण्यासाठी बारामती येथील राजे ग्रुपने अनोखी शक्कल लढवली आहे.
बारामती-मोरगाव रस्त्यावर जात “या रस्त्याच्या कामासाठी नेमलेले ठेकेदार व्ही.एच खात्री यांची परिस्थिती हलाकीची असल्याने राजे ग्रुपच्या सौजन्याने फलक लावण्यात येत आहे” अशा आशयाचे पोस्टर हातात घेवून राजे ग्रुपच्या सदस्यांनी प्रशासन आणि ठेकेदाराचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान,दोन दिवसांपूर्वीच मोरगाव रोड माळवाडी नजीक पेट्रोल पंपासमोर माझ्या जवळच्य. सहकाऱ्यांचा मोठा अपघात झाला होता.अपघात पाहता कोणालाही गंभीर स्वरुपाची दुखापत झाली नव्हती.सुदैवाने सगळे सुखरूप होते.सार्वजनिक बांधकाम विभाग,पुणे यांनी नेमलेल्या ठेकेदारान. रस्त्याच्या कामासाठी बाजूलाच मोठमोठे खडीचे ढीग टाकले असून तिथे कोणत्याही प्रकारे सूचना फलक लावले नाहीत. म्हणून त्या ठिकाणी आठ दिवसात सहा अपघात झाले आहेत.त्या अपघातात जखमी झालेल्यांचे नुकसान भरून न निघणार आहे.कोणी कायमचं अपंग झालं तर त्याची जबाबदारीकोण घेणार ? कोण घेणार असा संतप्त सवाल करत इथून पुढे प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन त्या ठिकाणी सूचना फलक लावण्यात यावे.असे त्या आंदोलनकर्त्यांनी सांगितले