विद्या प्रतिष्ठानमध्ये तीन दिवसीय वेब डेव्हलपमेंट इन पायथन जान्गो कार्यशाळा संपन्न
96 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला

विद्या प्रतिष्ठानमध्ये तीन दिवसीय वेब डेव्हलपमेंट इन पायथन जान्गो कार्यशाळा संपन्न
96 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला
बारामती वार्तापत्र
बारामती येथील विद्या प्रतिष्ठानचे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मधील बी. बी. ए. (सी. ए) विभाग यांनी वेब डेव्हलपमेंट इन पायथन जान्गो तीन दिवसीय कार्यशाळा आयोजित केले होते .
कार्यशाळा उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.भरत शिंदे, उपप्राचार्य डॉ. श्यामराव घाडगे, उपप्राचार्य लालासाहेब काशीद व्याख्यानाचे मार्गदर्शक श्रीकांत घाडगे आणि प्रशांत कारंडे डायरेक्टर ऑफ़ असेंटसॉफ़्ट उपस्थित होते. बी. बी. ए. (सी. ए.) विभागप्रमुख महेश पवार यांनी आपल्या प्रास्तविकमध्ये कार्यशालेची उद्दिष्ट व विभागामार्फत भविष्यात विद्यार्थ्यांना त्यांचे कौशल्य आणि ज्ञान वाढवण्यासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती दिली .प्राचार्य डॉ. भरत शिंदे यांनी अशा प्रकारच्या , कार्यशाळे मुळे विद्यार्थ्यांच्या वेब डेवलपमेंट आणि प्लेसमेंटमद्ये भर पडेल व तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरमध्ये याचा नक्कीच फायदा होईल याबाबत मार्गदर्शन केले.
कार्यशाला दरम्यान श्रीकांत घाडगे यांनी जान्गो फ़्रेमवर्क, फ़्रंट-ऐंड डेवलपमेंट थ्रू बूटस्ट्रॅप आणी बैक-ऐंड थ्रू एसक़्यूलाईट यांची ओळख करून दिली, त्यानंतर वैशिष्ट्ये आणि व्यावहारिक अनुप्रयोगांचे तपशीलवार स्पष्टीकरण दिले. या कार्यशाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी प्रामुख्याने वेबसाईट बनवल्या, सदर कार्यशाळेत टी वाय बी बी ए सीए या वर्गातील 96 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. व्याख्यानाला उपस्थित असणाऱ्या विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला तसेच विद्यार्थ्यांना ही कार्यशाळा खुप व्यवहरीक आणि नाविन्यपूर्वक वाटली.
व्याख्यानाचे समन्वयक म्हणून अक्षय भोसले यांनी काम पाहिले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल शिंदे यांनी केले तसेच अनिल कलोखे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. व्याख्यान यशस्वी होण्यासाठी पूनम गुंजवटे, वैशाली पेंढारकर,अक्षय शिंदे, कांचन खिरे, शुभांगी निकम यांनी विशेष परिश्रम घेतले.