इंदापूर

सावकाराने एकाला अंगावर पेट्रोल टाकून युवकाला जिवंत जाळले उपचारा दरम्यान युवकाचा मृत्यू

तत्पूर्वी फिर्यादीने पोलिसांना जबाब दिल्याने, इंदापूर पोलिसांनी आरोपीवर ३०२ चा गुन्हा दाखल करून आरोपींना बेड्या ठोकल्या.

सावकाराने एकाला अंगावर पेट्रोल टाकून युवकाला जिवंत जाळले उपचारा दरम्यान युवकाचा मृत्यू

तत्पूर्वी फिर्यादीने पोलिसांना जबाब दिल्याने, इंदापूर पोलिसांनी आरोपीवर ३०२ चा गुन्हा दाखल करून आरोपींना बेड्या ठोकल्या.

निलेश भोंग ; बारामती वार्तापत्र
बेकायदेशार सावकारकीच्या तसेच जमिनीच्या वादातून एकाचा खून करून ३०२ च्या गुन्ह्यात जामिनावर बाहेर असलेल्या खासगी सावकाराने एका साथीदाराच्या मदतीने निमगाव केतकी येथील २७ वर्षीय युवकाचे अपहरण करून. तसेच पैशाच्या मोबदल्यात जमीन नावावर करून देत नसल्याच्या कारणावरून अंगावर पेट्रोल टाकत त्या युवकाला जिवंत जाळल्याची घटना जंक्शन – कळस रोड वरील (ता.इंदापूर) फाॅरेस्ट हद्दीत घडली आहे. या घटनेत युवक ८० टक्के भाजल्याने तीन दिवसांच्या उपचारानंतर युवकाचा मृत्यू झाला.
नवनाथ हणुमंत राऊत (वय३२, रा.निमगाव केतकी, ता.इंदापूर) व सोमनाथ भिमराव जळक (वय३१, रा.इंदापूर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. त्यांना २६ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर शिवराज कांतीलाल हेगडे (वय २७, रा. निमगाव केतकी, ता.इंदापूर) असे मयत युवकाचे नाव आहे.
पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, ७ जुन रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी हा निमगाव केतकी हद्दीतील यशराज पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी गेला असता वरील आरोपींनी फिर्यादीला पाठीमागुन बंदुक लावुन, चारचाकी वाहनात बसवत त्याचे अपहरण केले. व तुझ्याकडे आणखी पैसे निघतात असे म्हणून १३ दिवस अज्ञातस्थळी एका खोलीत डांबुन ठेवले. दि.२० रोजी वरील आरोपींनी फिर्यादी शिवराज हेगडे याला सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास जंक्शन-कळस रोडवरील फाॅरेस्ट हद्दीत आणत त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून जिवंत पेटवुन दिले आणि त्यानंतर आरोपी तिथून पसार झाले.
या घटनेत शरीर पेटल्यानंतर फिर्यादीने जमिनीवर लोळुन आग विझवली. व रस्त्यावरील नागरिकांच्या मदतीने नातेवाईकांना बोलावून घेतले. नातेवाईकांनी त्याला इंदापूर उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. फिर्यादीच्या शरीराला जास्त भाजल्याने पुढील उपचारासाठी सोलापूर सिव्हील हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. तत्पूर्वी फिर्यादीने पोलिसांना जबाब दिल्याने, इंदापूर पोलिसांनी आरोपीवर ३०२ चा गुन्हा दाखल करून आरोपींना बेड्या ठोकल्या. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय धोत्रे हे करत आहेत.
चौकट
आरोपी सावकार या अगोदर ही खुनाच्या गुन्ह्यात होता जेलमध्ये…
सोमनाथ भिमराव जळक व फिर्यादी शिवराज कांतीलाल हेगडे हे एकमेकांचे जवळचे मित्र होते.मागील काही दिवसांपूर्वी या दोघांनी मिळुन सावकारकीच्या पैशासाठी त्यांच्याच एका मित्राच्या डोक्यात दगड घालत त्याचा खून करून मृृृृतदेह निमगाव केतकी येथील विहिरीत फेकून दिला होता. त्यावेळी इंदापूर पोलिसांनी दोघांनाही ३०२ च्या गुन्ह्यात अटक करुन जेलमध्ये टाकले होते. काही दिवसानंतर दोघेही जामिनावर बाहेर आले होते. तर सोमनाथ जळक व नवनाथ राऊत हे सराईत गुन्हेगार व खासगी सावकार असुन त्यांनी अनेक गोरगरीबांच्या शेतजमिनी व जागा व्याजाच्या पैशात बळकावल्याची शक्यता असून. त्यातुनच सोमनाथ जळकने पैशाच्या जोरावर दुसरा खून केल्याची चर्चा आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!