
सावधान! कोरोना पॉझिटिव्ह वाटचाल पन्नाशी कडे
शहरातील रुग्ण संख्या वाढलेलीच
बारामती वार्तापत्र
बारामतीत आज 43 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
बारामती शहरात 25 आणि बारामती ग्रामीण मध्ये 18 रुग्णसंख्या झालेली आहे.
काल झालेल्या शासकीय rt-pcr नमुन्यामध्ये 211 नमुन्यामधून एकूण पॉझिटिव्ह 28 रुग्ण आहेत
तसेच खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr 28 नमुन्यांपैकी 5 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
तर एंटीजनच्या 22 नमुन्यांपैकी एकूण 10 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
त्यामुळे काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 43 झाली आहे.
बारामतीत काल झालेल्या शासकीय प्रयोगशाळेत आरटीपीसीआर तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये पाहुणेवाडी येथील २४ वर्षीय पुरुष, सांगवी येथील ३८ वर्षीय महिला, सोनगाव येथील ३५ वर्षीय पुरुष, १० वर्षीय मुलगी, ५० वर्षीय पुरुष, पणदरे येथील ७५ वर्षीय महिला, ६५ वर्षीय पुरुष, रुई येथील ३७ वर्षीय पुरुष, कोराळे बुद्रुक येथील ६२ वर्षीय पुरुष, गोजुबावी येथील २५ वर्षीय पुरुष, खत्री इस्टेट येथील ५९ वर्षीय पुरुष, गडदरे वाडी येथील ५७ वर्षीय पुरुष, एमआयडीसी येथील ३८ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
जळोची येथील ३४ वर्षीय महिला, कसबा येथील ३५ वर्षीय पुरुष, कांचन नगर येथील ६० वर्षीय महिला, कोष्टी गल्ली येथील ६२ वर्षीय पुरुष, तांबे नगर येथील ३० वर्षीय पुरुष, कसबा येथील ५२ वर्षीय पुरुष, ढोर गल्ली येथील ४२ वर्षीय पुरुष, सुपा येथील ६५ वर्षीय पुरुष, शिवनगर येथील १० वर्षीय मुलगा, १४ वर्षीय मुलगी, फलटण रोड कसबा येथील ४४ वर्षीय महिला, कसबा येथील ५९ वर्षीय महिला, येथील ३९ वर्षीय पुरुष, बाबुर्डी येथील ७२ वर्षीय पुरुष, पारवडी येथील ६८ वर्षीय महिला रुग्णाचा समावेश आहे.
काल झालेल्या शासकीय रॅपिड अँटीजेन तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये विद्या प्रतिष्ठान येथील २८ वर्षीय पुरुष, तांदूळवाडी येथील ७२ वर्षीय पुरुष कोरोना बाधित आढळून आले आहेत.
बारामतीत काल मंगल लॅबोरेटरी खाजगी प्रयोगशाळेत येथे तपासलेल्या नमुन्यांमध्ये आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये महावीर भगवान शेजारील ६९ वर्षीय महिला, सूर्यनगरी एम आय डि सी रोड येथील ८४ वर्षीय महिला, महावीर महावीर पथ रत्नाकर बँके शेजारी ३४ वर्षीय पुरुष, प्रगती नगर वाल नेट अपार्टमेंट येथील ३६ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
वेदांगी नवज्योत महिला सोसायटी एमआयडीसी येथील ४१ वर्षीय महिला, झगडे गॅरेज अमराई शेजारील ३७ वर्षीय महिला, मोता कलेक्शन शेजारील ३० वर्षीय पुरुष, ३० वर्षीय महिला, विद्यानगर येथील ६५ वर्षीय पुरुष, ग्रीन पार्क एमआयडीसी येथील १५ वर्षीय पुरुष, धुमाळवाडी पणदरे येथील ७३ वर्षीय पुरुष कोरोना बाधित आढळून आले आहेत.
बारामतीतील आज पर्यंत एकूण रुग्ण संख्या ६९३७ तर एकूण बरे झालेले रुग्ण ६४३३ एकूण मृत्यू १४६.
तुम्ही काळजी घ्या ,अनावश्यक गर्दी टाळा ,सॅनिटायझर ,मास्कचा वापर करा.