सावधान; मोबाईल सॅनिटाईज टाळा; हा धोका वाचवा…
कोरोनापासून आपला बचाव करण्यासाठी अनेक जण सॅनिटायझरचा वापर करत आहेत.
सावधान; मोबाईल सॅनिटाईज टाळा; हा धोका वाचवा…
कोरोनापासून आपला बचाव करण्यासाठी अनेक जण सॅनिटायझरचा वापर करत आहेत.
बारामती वार्तापत्र
यामध्ये एसटी प्रशासनाकडूनही प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी एसटी गाड्या सॅनिटाईज करण्यात येत आहेत. यामुळे गाड्यांमधील सीट कव्हर आणि हँडल बार आदी सामान खराब होत आहेत. तसेच मोबाईलमध्येही बिघाड होण्याचे प्रमाण खूप वाढले असल्याची बाब समोर येत आहे.
या व्हायरसपासून बचाव करण्यासाठी सॅनिटाईज करून घेण्याबाबत सांंगितले गेले. सध्या सर्व बाहेरून घरात जात असताना आपल्यासोबत असलेल्या प्रत्येक वस्तू सॅनिटाईज करून घेऊनच घरात प्रवेश करत आहेत. यात मोबाईल, चावी, पर्स आदी वस्तूंचा समावेश आहे.
मोबाईलमध्ये बिघाड
अनेक मोबाईलचे डिस्प्ले झाले खराब, तर अनेक डेड सॅनिटायझर मोबाईलमध्ये गेल्यामुळे मोबाईलचे आय.सी. खराब होणे, डिस्प्ले खराब होणे, मोबाईल पूर्ण बंद होणे असे प्रॉब्लेम येत आहेत. यामुळे गेल्या दोन महिन्यात शेकडो मोबाईल दुरुस्तीसाठी आलेले आहेत. यातील अनेक मोबाईलचे डिस्प्ले खराब झाले आहेत, तर अनेक मोबाईल डेड झाले आहेत, अशी माहिती मोबाईल दुकानदार ओंकार कम्युनिकेशन बारामती यांनी दिली.
सॅनिटायझरचा वापर केल्यामुळे वस्तूवर रासायनिक प्रक्रिया होते. याामुळे वस्तूंवरील कोटिंग निघून जाते. यामुळे वस्तू गंजण्याची प्रक्रिया सुरू होते. सॅनिटायझरचा हवेशी संबंध आल्यानंतर उडून जात असतो, पण जेव्हा मोबाईलमध्ये सॅनिटायझर जातो, तेव्हा मोबाईल हे सर्व बाजूने बंद असल्यामुळे त्यात जास्त काळ टिकतो, यामुळे मोबाईल खराब होण्याची शक्यता जास्त असते, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
सॅनिटायझर आयसोप्रोपाईन अल्कोहोल, हायड्रोजन पेरॉक्साईड, ग्लिसेरॉल आदी रासायनिक मिश्रणाने तयार होते. यातील आयसोप्रोपाईन अल्कोहोल हा विषाणू मारण्यासाठी, हायड्रोजन पेरॉक्साईड या मिश्रणात काही जंतू असल्यास ते मारण्यासाठी आणि ग्लिसेरॉल हे हातात ओलावा निर्माण होऊन हात निर्जंतुकीकरणासाठी वापरतात. सॅनिटायझरचा वापर जास्त प्रमाणात झाला तर लोखंडी वस्तू गंजतात.