पंढरीची वारी घडविली थ्रीडी रंगोळीतून…
कऱ्हा नदीकाठी वसलेल्या सासवड मध्ये थ्रीडी रांगोळीतून आठवणीतली वारी.
पंढरीची वारी घडविली थ्रीडी रंगोळीतून…
कऱ्हा नदीकाठी वसलेल्या सासवड मध्ये थ्रीडी रांगोळीतून आठवणीतली वारी
कोरोनामुळे यंदा पंढरीची वारी घडली नाही पालखी सोहळ्यात जाता आले नाही त्यामुळे पालखीतील वैष्णवांचा मेळा दिंड्या पताका वारीतील संप्रदायीक खेळ क्षण सारे संत सोपान देवाची समाधीस्थळ असलेल्या सासवड शहरात आठवणीतील वारी थ्रीडी रांगोळी चे प्रदर्शन सुरू आहे सासवडचे रंगावलीकार सोमनाथ भोंगळे व सात सहकाऱ्यांनी ही थ्रीडी वारी साकारली आहे.
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यानिमित्त जुन्या वारीतील क्षण रांगोळी रंगभरण पद्धतीने आणि तेही थ्रीडीमध्ये साकारले आहेत. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त थ्रीडी रांगोळी कलाकार सोमनाथ अनंतराव भोंगळे यांनी ही आठवणीतील वारी अक्षरशः हुबेहूब साकारली आहे.
त्याला समक्ष व सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळत आहे.