‘सासूचे दिवस संपलेत, आता सुनेचे दिवस आलेत’ उपमुख्यमंत्री,अजित पवार
'राज्यात, महापालिकेत सत्तेत असताना आमचे कार्यकर्ते फोडायचे राजकारण विरोधकांनी केले. मात्र, आता सासूचे दिवस संपले असून, सुनेचे दिवस आले आहेत,' असे सूचक वक्तव्य अजित पवार यांनी शुक्रवारी केले.
‘सासूचे दिवस संपलेत, आता सुनेचे दिवस आलेत’ उपमुख्यमंत्री,अजित पवार
‘राज्यात, महापालिकेत सत्तेत असताना आमचे कार्यकर्ते फोडायचे राजकारण विरोधकांनी केले. मात्र, आता सासूचे दिवस संपले असून, सुनेचे दिवस आले आहेत,’ असे सूचक वक्तव्य अजित पवार यांनी शुक्रवारी केले.
पुणे; बारामती वार्तापत्र रिपोर्ट
‘राज्यात, महापालिकेत सत्तेत असताना आमचे कार्यकर्ते फोडायचे राजकारण विरोधकांनी केले. मात्र, आता सासूचे दिवस संपले असून, सुनेचे दिवस आले आहेत,’ असे सूचक वक्तव्य अजित पवार यांनी शुक्रवारी केले. ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीला यश मिळाले, त्याचप्रकारे मतांची विभागणी होऊ न देता महापालिका निवडणुकीतही यश मिळवायचा प्रयत्न करू,’ असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमधील काही नगरसेवक संपर्कात असल्याच्या चर्चेबाबत विचारणा केली असता, ‘राज्याचा उपमुख्यमंत्री या नात्याने अनेक लोक मला भेटतात. मात्र, त्याचा अर्थ लगेच काही घडेल, असा होत नाही,’ असे ते म्हणाले. ‘गेल्या पाच वर्षांत काय घडले, याचा निवडणूक आल्यावर पुणेकर जरूर विचार करतील. ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीच्या तिन्ही घटक पक्षांनी यश मिळविले. त्याचप्रमाणे महापालिका निवडणुकीतही मतांची विभागणी होऊ न देण्याचा आमचा प्रयत्न असेल,’ असेही पवार म्हणाले. राज्याच्या आगामी अर्थसंकल्पात पुणे मेट्रोसह विविध पायाभूत प्रकल्पांसाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली.
पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वडगाव बुद्रुक येथील राज्यस्तरीय पाणी तपासणी प्रयोगशाळेच्या इमारतीचे भूमिपूजन पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री डॉ. गुलाबराव पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. संजय चहांदे, ‘भूजल’चे संचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, प्राधिकरणाचे सदस्य सचिव किशोरराजे निंबाळकर यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शुद्ध पाणी देताना नागरिकांच्या आरोग्याचा विचार झाला पाहिजे. त्यासाठी राज्यस्तरीय पाणी तपासणी प्रयोगशाळा देशात ‘आदर्श मॉडेल’ म्हणून उभारावी. प्रयोगशाळेची इमारत पुण्याच्या वैभवात भर टाकणारी असावी. नागरिकांना शुद्ध व गुणवत्तापूर्ण पाणी दिल्याने शंभर टक्के पुण्य महाविकास आघाडीच्या पदरी पडेल,’ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.