सिद्धेश्वर निबोडी मध्ये दोघे पॉझिटिव्ह.
रविवार 31 मे रोजी बारामती तालुक्यातील सिध्देश्वर निंबोडी येथील दोघांना करोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. सिध्देश्वर निंबोडीकरांना
मात्र गेली तीन दिवस ज्या गोष्टीची भीती वाटत होती, ते खरे झाले. पुण्यातील पोलिस अधिकारी मुलगा आईवडीलांना भेटण्यासाठी आला, मात्र तो निघून गेल्यानंतर पंधरा दिवसांनी सिध्देश्वर निंबोडीतील दोघांना करोनाची बाधा झाली आहे. आजच्या दोन रुग्णांमुळे बारामती तालुक्याच्या ग्रामीण भागात करोनाचा सिलसिला यामुळे कायम राहीला आहे. सिध्देश्वर निंबोडी येथील १३ वर्षाचा मुलगा व ६५ वर्षाच्या ज्येष्ठ व्यक्तीस कोरोनाची बाधा झाली आहे. सिध्देश्वरनिंबोडी येथील मूळच्या परंतू सध्या पुण्यात पोलिस अधिकारी असलेल्या अधिकाऱ्याच्या कुटुंबातील चौघांना त्रास
होत असल्याने दोन दिवसांपूर्वी रुई येथील कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांचे घशातील स्त्रावाचे नमुने काल घेण्यात आले होते. बारामतीतच त्यांची तपासणी झाली. चारपैकी दोघांचे नमुने निगेटिव्ह आले, तर दोघांचे नमुने पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. दरम्यान पोलिस अधिकारी असलेला मुलगा सिध्देश्वर निंबोडीत १३ मे रोजी आईवडीलांना भेटण्यास आला होता. त्यानंतर २७ मे रोजी त्याची पुण्यात कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने कुटुंबियही काळजीत सापडले होते. त्यातच गावात वेगवेगळ्या अफवांना उत आला. या पोलिस अधिकाऱ्याच्या कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींना व मुलांना ताप व खोकल्याचा त्रास सुरू झाल्याने त्यांना बारामतीत रुई येथील कोरोना कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी आणण्यात आले.तेथे त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. या दरम्यान पोलिस अधिकारी कोरोनाबाधित असल्याने डॉक्टरांनी त्यांचे नमुने चाचणीसाठी घेतले. त्याचा अहवाल आता दुपारी आला व त्यातील दोन
जणांचे नमने पॉझिटिव्ह आले आहेत. सिध्देश्वर निंबोडीकरांच्या दोन रात्री चिंतेत दरम्यान सिध्देश्वर निंबोडीत चार जणांना त्रास होत असल्याची माहिती गावात पसरल्यानंतर वेगवेगळ्या अफवा पसरल्या होत्या. मात्र दुर्दैवाने आज दोघांचे नमुने पॉझिटिव्ह आल्यानंतर आता सिध्देश्वर निंबोडीच-गवणशी संबंध दररोज असतो. त्यामुळे भिगवणकरांची सुद्धा चिंता वाढली आहे .बारामती तालुक्यात आता कोरोना पॉझिटिव्ह ची संख्या वाढत असल्याने व व्यवहार पूर्ववत होत असताना बारामती करांची सुद्धा चिंता वाढत आहे.