इंदापूर

सिनेसृष्टीत व वेब सिरीजमध्ये इंदापूर तालुक्याचे नाव ही मोठी अभिमानाची गोष्ट – हर्षवर्धन पाटील

नापास कट्टा टीमचे हर्षवर्धन पाटील यांनी केले तोंडभरून कौतुक

सिनेसृष्टीत व वेब सिरीजमध्ये इंदापूर तालुक्याचे नाव ही मोठी अभिमानाची गोष्ट – हर्षवर्धन पाटील

नापास कट्टा टीमचे हर्षवर्धन पाटील यांनी केले तोंडभरून कौतुक

बारामती वार्तापत्र
इंदापूर तालुक्यातील युवकांनी एकत्र येऊन “नापास कट्टा” हि वेबसिरीज परीक्षेत नापास झालेल्या मुलांच्या जिवनावर आधारीत बनवली असून या वेबसिरीजच्या सर्व टीमने आज माजी मंत्री व भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांची इंदापूर येथील निवासस्थानी भेट घेतली व या वेबसिरीजची माहिती दिली यावेळी बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी वरील मत व्यक्त केले.

या वेबसिरीजचे दिग्दर्शक अतुल भालेराव, निर्माता-चंद्रकांत लांडगे,कथा-पटकथा व संवाद-समीर पठाण आदींच्या प्रयत्नातून ही व्यवस्थित तयार झाली आहे. तर प्रशांत मखरे, सुप्रीया खाडे, राहुल बिबे,कुमार शिंदे, किरण उघडे, रोहित शिंदे, अशितोश माने, प्राजक्त लोलगे,अमोल वाघ, सागर कांबळे, ज्योती अंधारे , पद्मजा खटावकर, जगन्नाथ घाडगे, मारुती वाघ,सचीन चव्हाण , उत्तम लांडगे, अमोल लांडगे व बबलु भोसले आदी कलाकार यात काम करत आहेत.

हर्षवर्धन पाटील यांनी काही मदत लागल्यास निसंकोचपणे मला संपर्क करा. आपल्या माध्यमातून तालुक्याचे नाव सिनेसृष्टीत व वेब सिरीज मध्ये गाजत आहे ही खूप मोठी अभिमानाची गोष्ट असल्याचे मत व्यक्त करून त्यांना पुढील वाटचालीसाठीच्या शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!