सिरमच्या कोव्हाव्हॅक्स लसीच्या लहान मुलांवरील क्लिनीकल ट्रायलला सुरुवात ?
भारतात 9 ठिकाणी 1 हजार मुलांवर ही ट्रायल करण्यात येणार आहे

सिरमच्या कोव्हाव्हॅक्स लसीच्या लहान मुलांवरील क्लिनीकल ट्रायलला सुरुवात ?
भारतात 9 ठिकाणी 1 हजार मुलांवर ही ट्रायल करण्यात येणार आहे
पुणे :बारामती वार्तापत्र
देशात तसेच महाराष्ट्रात कोरोना लसीकरणाची मोहीम युद्धपातळीवर राबवली जात आहे. तर दुसरीकडे लहान मुलांच्या लसीकरणासाठी लस निर्मिती करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. सिरमच्या कोव्हाव्हॅक्स लसीच्या लहान मुलांवरील क्लिनीकल ट्रायलला सुरुवात झाली असून भारतात 9 ठिकाणी 1 हजार मुलांवर ही चाचणी करण्यात येणार आहे. पुण्यात तर या चाचणीला सुरुवतादेखील झाली आहे. बुधवारी 9 मुलांना लस देण्यात आलीय.
पुणे जिल्ह्यातील 100 मुलांवर केली जाणार चाचणी
सध्या देशात 18 वर्षे तसेच त्यापेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात आहे. राज्यात तर ही प्रक्रिया युद्धपातळीवर राबवण्यात येतेय. तर दुसरीकडे सिरम इन्स्टिट्यूटमार्फत 18 वर्षाखालील मुलांसाठी लस निर्मिती करण्यात आली असून त्याची क्लिनिकल ट्रायल सुरु झाली आहे. पुणे जिल्ह्यातील भारती हॉस्पिटलमध्ये 100 मुलांवर ही क्लिनिकल चाचणी केली जाणार आहे. यामध्ये 2 ते 18 वयोगटातील मुलांना ही लस दिली जाईल.
पुण्यात बुधवारी 9 मुलांना दिली लस
याच क्लिनिकल ट्रायल अंतर्गत पुण्यात बुधवारी 9 मुलांना लस देण्यात आली. देशाच्या विविध भात ही चाचणी प्रक्रिया पार पाडली जातेय. येत्या ऑक्टोबरअखेर चाचणीची प्रक्रिया होणार पूर्ण होण्याची शक्यता आहे.
पुढील वर्षी जानेवारी महिन्यात लहान मुलांचे लसीकरण
विशेष म्हणजे चाचणी पूर्ण झाल्यानंतर या लसीचे परिणाम जर सकारात्मक आले तर पुढील वर्षी जानेवारी महिन्यात लहान मुलांच्या लसीकरणाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. तशी माहिती भारती हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. संजय ललवाणी यांनी दिली आहे.