आज सकाळी तीन जणांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. आज दुपारपर्यंत उर्वरित अहवालांमध्ये आणखी दोन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.
आज दुपारी तीन वाजता संपूर्ण बारामतीसह औद्योगिक वसाहतीपर्यंतचे दैनंदिन व्यवहार बंद झाले.

आज सकाळी तीन जणांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. आज दुपारपर्यंत उर्वरित अहवालांमध्ये आणखी दोन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.
आज दुपारी तीन वाजता संपूर्ण बारामतीसह औद्योगिक वसाहतीपर्यंतचे दैनंदिन व्यवहार बंद झाले.
बारामतीतील कोरोना बाधितांच्या संपर्कातील एकूण ६९ जणांपैकी पाचजणांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आज सकाळी तीन जणांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. आज दुपारपर्यंत उर्वरित अहवालांमध्ये आणखी दोन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. काल व आज मिळून बारामतीत २३ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. दरम्यान अजून २२ जणांचा अहवाल अद्याप प्रतिक्षेत आहे.
बारामतीत काल पासून कोरोनाचे रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढले आहे. शहरात मोठ्या प्रमाणावर रुग्ण सापडण्याची गेल्या पाच महिन्यातील ही पहिलीच वेळ असल्याने नागरिकांबरोबर प्रशासनही चिंतेत आहे. आज सकाळी शहरातील मारवाड पेठेतील ज्येष्ठ बांधकाम व्यावसायिकास कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले, तर गुनवडी चौकातील शाहू कॉम्प्लेक्समधील कोरोनाबाधिताच्य़ा संपर्कातील महिलेसही कोरोनाची लागण झाली. त्यांच्यासह तीन जणांचे अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर दुपारपर्यंत ४७ जणांचे अहवाल पूर्ण झाले, त्यामध्ये पुन्हा नव्याने दोन जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान आज दिवसभरात आतापर्यंत पाच जणांन कोरोनाची बाधा झाली असली तरी अजूनही २२ जणांचे अहवाल बाकी असल्याने ही संख्या वाढतेय की काय याची चिंता आहे. दरम्यान आज पासून बारामतीत नव्याने बाजारपेठेतील वेळा प्रांताधिकाऱ्यांनी ठरवून दिल्या आहेत. त्यानुसार आज दुपारी तीन वाजता संपूर्ण बारामतीसह औद्योगिक वसाहतीपर्यंतचे दैनंदिन व्यवहार बंद झाले.