सीरम इन्स्टिट्युटचे सीईओ अदर पूनावाला यांनी एक मोठी घोषणा
ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात लहान मुलांसाठी कोरोना लस

सीरम इन्स्टिट्युटचे सीईओ अदर पूनावाला यांनी एक मोठी घोषणा
ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात लहान मुलांसाठी कोरोना लस
नवी दिल्ली : बारामती वार्तापत्र
सीरम इन्स्टिट्युटचे सीईओ अदर पूनावाला यांनी एक मोठी घोषणा केली आहे. येत्या ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सीरमची लहान …
सीरम इन्स्टिट्युटचे सीईओ अदर पूनावाला यांनी एक मोठी घोषणा केली आहे. येत्या ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सीरमची लहान मुलांसाठीची कोवोवॅक्स कोरोना लस लॉन्च होणार असल्याचं अदर पूनावाला यांनी म्हटलंय. नवी दिल्लीत ही मोठी घोषणा केली आहे.
सीरम सध्या कोवावॅक्स कोरोना लशीवर संशोधन करत आहे. ही कोरोना प्रतिबंधक लस 12 वर्षांवरील मुलांसाठी विकसीत करण्यात येत आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात ही लस भारतात लॉन्च केली जाऊ शकते. त्यामुळे भारतातल्या कोरोनाविरोधातल्या लढ्याला आणखी बळ मिळणार आहे. विशेष म्हणजे पुढच्या वर्षी मार्चपर्यंत 12 वर्षाखालील मुलांसाठीची कोरोना लस येऊ शकते असंही पूनावाला यांनी स्पष्ट केलं आहे.
अदर पूनावाला-अमित शाह भेट
सीरम इन्स्टिट्युटचे सीईओ अदर पूनावाला यांन आज नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये देशातली कोरोना स्थिती आणि लसीकरणाबाबत चर्चा झाली. अमित शाहांच्या भेटीनंतर ही मोठी घोषणा केली.
लहान मुलांवर लसीची चाचणी सुरू
सीरम इन्स्टिट्युटकडून 2 ते 17 वर्षे वयोगटातल्या मुलांवर कोरोना लसीची चाचणी (Vaccine Trail) सुरू असल्याची माहिती पूनावाला यांनी दिली. कोवोवॅक्स लसीची दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातली चाचणीसाठी काही शर्थींसह परवानगी देण्याची मागणी सीरम इन्स्टिट्युटे केली आहे. या चाचणीमध्ये देशातल्या 10 शहरांमधली 920 मुलं सहभागी होणार आहेत. ज्यात 2 ते 11 वर्षे आणि 12 ते 17 वर्षे अशा दोन वयोगटातली प्रत्येकी 460 मुलं आहेत.