सुपे परिसरातील विविध विकासकामांची उपमुख्यमंत्री अजित पवार केली पाहणी
शुभारंभ व संभुराजे प्रतिष्ठान सुपे आयोजित बैलगाडा शर्यतीचे उद्घाटन आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
सुपे परिसरातील विविध विकासकामांची उपमुख्यमंत्री अजित पवार केली पाहणी
शुभारंभ व संभुराजे प्रतिष्ठान सुपे आयोजित बैलगाडा शर्यतीचे उद्घाटन आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
बारामती वार्तापत्र
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सुपे परिसरातील कृषि उत्पन्न बाजार समितीची इमारत, ग्रामीण रुग्णालय इमारत, सुपे ग्रामीण पोलीस स्टेशन, मयुरेश्वर अभयारण्य, विद्या प्रतिष्ठान संकुल इत्यादी ठिकाणी चाललेल्या कामांची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना कामे वेळेत आणि दर्जेदार करण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, महावितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता सुनिल पावडे, तहसिलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी अनिल बागल, सार्वजनिक बांधकाम पूर्व विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल ढेपे, उपअभियंता सा. बा. वि. राहुल पवार आदी उपस्थित होते.
पुणे महानगर परिवहन महामंडळातर्फे नव्याने सुरू केलेल्या हडपसर- चौफुला- सुपे व हडपसर- सासवड- जेजुरी- सुपे या बस सेवेचा शुभारंभ व संभुराजे प्रतिष्ठान सुपे आयोजित बैलगाडा शर्यतीचे उद्घाटन आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.