सुप्रसिद्ध अभिनेत्रीने घेतला भिगवण येथील मच्छीचा आस्वाद;कोण आहे ती अभिनेत्री पहा
प्रवासा दरम्यान हॉटेल वर्धिनी येथे घेतला मच्छीचा आस्वाद
सुप्रसिद्ध अभिनेत्रीने घेतला भिगवण येथील मच्छीचा आस्वाद;कोण आहे ती अभिनेत्री पहा
प्रवासा दरम्यान हॉटेल वर्धिनी येथे घेतला मच्छीचा आस्वाद
इंदापूर:सिद्धार्थ मखरे (प्रतिनिधी)
सुप्रसिद्ध अभिनेत्री, नृत्यांगना व ‘अप्सरा आली’ या नृत्यावर आधारित कार्यक्रमात प्रथम क्रमांक पटकवणारी एक उत्तम नृत्यांगना व तुझ्यात जीव रंगला या टीव्ही सिरीयल मधून समदं महाराष्ट्राच्या मनात भुरळ घालणारी अभिनेत्री माधुरी पवार यांनी इंदापूर तालुक्यातील भिगवण या ठिकाणी मच्छी खाण्याचा आस्वाद घेतला आहे.
उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्राच्या नजीक असणाऱ्या इंदापूर तालुक्यातील भिगवण या गावात नेहमीच ताजे व उत्तम दर्जाचे मासे मिळत असल्याने या ठिकाणच्या हॉटेल वरती मिळणारी मच्छी थाळी ही इंदापूर तालुक्यासह संपूर्ण पुणे जिल्ह्यात प्रसिद्ध आहे.पुणे-सोलापूर महामार्गावर पुण्यापासून शंभर किलोमीटर वरती असणाऱ्या भिगवण या गावानजीक अनेक छोटे-मोठे मच्छीच्या खानावळी,हॉटेल्स व ढाबे आहेत.या ठिकाणी उत्तम दर्जाची चविष्ट व ताजे मासे मिळत असतात. त्यामुळे खवय्ये पुणे-सोलापुर महामार्गावरून जात असताना भिगवण या ठिकाणी नेहमीच मांसाहार जेवण्यासाठी थांबत असतात.
अशाच पद्धतीने मच्छी खाण्याचा आस्वाद प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी पवार यांनी घेतला आहे. नियोजित कार्यक्रमानंतर त्या कर्जत येथून पुण्याकडे जात असताना भिगवणला आल्यानंतर त्यांच्या नातलगांनी भिगवण ची मच्छी खाण्याची विनंती केली. यावरती त्यांनीही प्रसिद्ध असलेल्या भिगवणनच्या वर्धिनी हॉटेलला थांबत ताजी व दर्जेदार मच्छी खाण्याचा आस्वाद घेतला.