सुप्रसिद्ध गारवा हॉटेल च्या मालकावर झालेल्या खुनी हल्ल्याचा व्हिडिओ वायरल ; मालकाचा उपचारादरम्यान मृत्यू
पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचारा दरम्यान बुधवारी (दि. २०) पहाटे अडीच वाजणेच्या सुमारास त्यांचे निधन

सुप्रसिद्ध गारवा हॉटेल च्या मालकावर झालेल्या खुनी हल्ल्याचा व्हिडिओ वायरल ; मालकाचा उपचारादरम्यान मृत्यू
पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचारा दरम्यान बुधवारी (दि. २०) पहाटे अडीच वाजणेच्या सुमारास त्यांचे निधन
पुणे :क्राईम ; बारामती वार्तापत्र
उरुळी कांचन येथील सुप्रसिद्ध असलेल्या हॉटेल गारवा चे मालक रामदास आखाडे यांच्यावर रविवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास जीवघेणा हल्ला करण्यात आला त्यामध्ये रामदास आखाडे हे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेचे CCTV फुटेज बारामती वार्तापत्र च्या हाती लागले असून या फुटेजमध्ये एक हल्लेखोर तलवारीने रामदास आखाडे यांच्यावर सपासप वार करताना दिसत आहे.
अठ्ठेचाळीस तासांची मृत्यूची झुंज अखेर अपयशी ठरली. रामदास आखाडे पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचारा दरम्यान बुधवारी (दि. २०) पहाटे अडीच वाजणेच्या सुमारास त्यांचे निधन झाले आहे .या अनुचित प्रकाराने एका यशस्वी उद्योजकाची प्राणयात्रा संपल्याने नागरीकांत प्रचंड हळहळ व संताप व्यक्त होत आहे.
रविवारी (दि. १८) रात्री पावणे नऊ च्या सुमारास दोघा हल्लेखोरांपैकी एकाने हॉटेलमध्ये प्रवेश करुन तलवारीने रामदास आखाडेंवर जिवघेणा हल्ला केला होता.
VIDEO – पहा व्हिडीओ : रामदास आखाडे यांच्यावर जीवघेणा हल्ला
पुण्यातील रुग्णालयात सर्व प्रकारची प्रयत्नांची शिकस्त करुन त्यांचे प्राण वाचविण्याचा प्रयत्न रुग्णालयाने केला होता.
मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश मिळू शकले नाही.
दरम्यान रामदास आखाडे यांचे मूळचे गाव दौंड तालुक्यातील जावजीबुवाची वाडी हे असुन शेती हा मुळ व्यवसाय आहे.
त्यांच्या पश्चात आई , वडील , पत्नी , दोन भाऊ , दोन मुले असा परिवार आहे.
रामदास आखाडे यांच्यावर रविवारी झालेल्या हल्ल्यानंतर या गुन्हाचा उलगडा पोलिसांनी केला आहे.या हल्ल्यावरुन तिघा संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र या हल्ल्यामागिल मुख्य आरोपी अद्याप फरारी आहे. व्यवसायातील स्पर्धेतून हा हल्ला घडला असावा अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.