सुसज्ज अस बस स्थानक येत्या काही महिन्यातच बारामतीकरांच्या सेवेत
बांधकामासाठी ५५ कोटीचा निधी.. प्रवाशांना मिळणार विविध सुविधा.

सुसज्ज अस बस स्थानक येत्या काही महिन्यातच बारामतीकरांच्या सेवेत
बांधकामासाठी ५५ कोटीचा निधी.. प्रवाशांना मिळणार विविध सुविधा.
बारामती वार्तापत्र
राज्यातील सर्वात उत्कृष्ट असं विविध सुविधा असलेलं सुंदर व प्रशस्त बस स्थानक बारामतीकरांच्या सेवेसाठी उपलब्ध होणार आहे .त्याचे काम पुढील काही महिन्यांत पूर्ण होईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे (एसटी) पुणे विभाग प्रमुख रमाकांत गायकवाड यांनी दिली.
नव्या बसस्थानकामध्ये बावीस बसथांबे असतील आणि ८७ बसेस उभ्या करता येतील असे प्रशस्त पार्किंग असेल. हे बसस्थानक येत्या काही महिन्याभरात पूर्ण होणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. बारामतीतील बसस्थानकाची स्थिती दयनीय झाली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढाकार घेत जुन्या बसस्थानकाच्या जागी सुसज्ज व अत्याधुनिक सुविधा असलेले बसस्थानक उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आता
या बसस्थानकाचे काम वेगाने सुरु झाले आहे. राज्यातील सर्वात अलिशान अशा अर्थाने हे बसस्थानक असेल, जिथे महिला प्रवाशांसाठी पुरुष प्रवाशांसाठी अत्यंत
चांगल्या सुविधा असतील. त्याचबरोबर प्रशस्त
विश्रांती कक्ष असतील. कार्यालये दर्जेदार असतील आणि साहित्य घेऊन जाण्यासाठीची सुविधा देखील एकदम वेगळी असेल
या बसस्थानकासाठी सुमारे ५५ कोटी रुपये खर्च येणार आहे. या इमारतीत २२ बसथांबे असतील, तर डेपोच्या पार्किंगमध्ये रात्री जवळपास ८७ बस उभ्या राहू शकतील. बारा व्यावसायिक
गाळेही या ठिकाणी बांधण्यात येणार असून प्रवाशांच्या सोयीसाठी कॅन्टींग ही असणार आहे.