सेलिब्रेटिंकडून देशभक्ती शिकण्याची वेळ अजून आली नाही – राजू शेट्टी
इंदापूर येथे पत्रकारांशी बोलताना केले विविध विषयांवर भाष्य
सेलिब्रेटिंकडून देशभक्ती शिकण्याची वेळ अजून आली नाही – राजू शेट्टी
इंदापूर येथे पत्रकारांशी बोलताना केले विविध विषयांवर भाष्य
इंदापूर : प्रतिनिधी
इंदापूर तालुक्यात २०१३ साली ऊस दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आंदोलन करण्यात आले होते.या प्रकरणात मा.खासदार राजू शेट्टींसह अनेक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. या संदर्भात ते आज (दि.९) रोजी इंदापूर न्यायालयात आले असता त्यांनी पत्रकारांशी विविध विषयांवर भाष्य केले.
तथाकथित सेलिब्रिटी हे सरकारचे अनुदान,सरकारची मदत,सरकारचे लाभ घेण्यासाठी सोखावलेले आहेत.त्यांना जनतेने मोठे केले आणि आज देशातील शेतकऱ्यांनी जनआंदोलन उभे केले असताना तिथे मात्र सरकारची बाजू घेऊन तथाकथित देशभक्ती आम्हाला शिकवत असतील तर यांच्याकडून देशभक्ती शिकण्याची वेळ अजूनपर्यंत आमच्यावर आली नाही.सरकारला खरंच अस्मिता असेल तर यांच्या आर्थिक भानगडी बाहेर काढाव्यात अस मत त्यांनी व्यक्त केले.
पुढे शेतकरी आंदोलनाबद्दल बोलताना ते म्हणाले की, देशभरात 80 कोटी शेतकर्यांचे आंदोलन सुरू असताना सुद्धा केंद्र सरकारकडून मूठभर शेतकऱ्यांचे आंदोलन असल्याचे भासवले जात आहे.