सोनगाव चे प्रसिद्ध सोनेश्वर मंदिर महाशिवरात्रीला भाविकांसाठी बंद !
कोरोना विषाणूचा प्रसार गर्दीमुळे वाढू नये

सोनगाव चे प्रसिद्ध सोनेश्वर मंदिर महाशिवरात्रीला भाविकांसाठी बंद !
कोरोना विषाणूचा प्रसार गर्दीमुळे वाढू नये
बारामती वार्तापत्र
राज्यात कोरोणाचा पुन्हा प्रसार वाढलेला असून महाशिवरात्रीनिमित्त सोनगाव येथील प्रसिद्ध सोनेश्वर मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
कोरोणाचा वाढता प्रसार व त्याचा प्रतिबंध व नियंत्रणासाठी राज्यातील महत्त्वाचे ब वर्ग दर्जाचे तीर्थक्षेत्र म्हणून सोनेश्वर मंदिर प्रसिद्ध आहे. या ठिकाणी दरवर्षी महाशिवरात्री निमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक दर्शना करता येत असतात त्यामुळे या ठिकाणी गर्दी होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे कोरोना विषाणूचा प्रसार गर्दीमुळे वाढू नये यादृष्टीने कार्यकारी दंडाधिकारी विजय पाटील यांनी जिल्हाधिकारी आपत्ती व्यवस्थापन कक्ष यांच्या आदेशानुसार सोनगाव तालुका बारामती येथील सोमेश्वर मंदिर दिनांक 11 / 3 /2021 रोजी भाविकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.