स्थानिक

सोमेश्वरच्या सभासद व कामगारांची दिवाळी गोड: अंतिम दर ३००० हजार कामगारांना १५ टक्के बोनस

सभासदांची दिवाळी झाली गोड!

सोमेश्वरच्या सभासद व कामगारांची दिवाळी गोड: अंतिम दर ३००० हजार कामगारांना १५ टक्के बोनस

सभासदांची दिवाळी झाली गोड!

बारामती वार्तापत्र
श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे हंगाम सन२०१९-२०२० मध्ये गाळप केलेल्या ऊसाकरीता एफआरपी प्र.मे.टन रु.२७८८.५१ इतकी आलेली असून सदर गाळप हंगामामध्ये कारखान्याने एकूण ९ लाख ३४ हजार मे.टन ऊसाचे गाळप केलेलेआहे.

कारखान्याने गाळप हंगाम सन २०१९-२०२० मध्ये गाळप केलेल्या ऊसाकरीता आजपर्यंत एकूण रक्कम रु.२९००/- प्र.मे.टन याप्रमाणे केन पेमेंट अदा केलेले असून सोमवार दि.२/११/२०२० रोजी पार पडलेल्या मा.संचालक मंडळाच्या सभेमध्ये आडसाली ऊसाकरीता प्र.मे.टन रु.३०००/-, पुर्व हंगामी ऊसाकरीता रु.३०७५/- आणि सुरु व खोडवा ऊसाकरीता रु.३१००/- प्र.मे.टन याप्रमाणे अंतीम ऊस बील देण्याचा निर्णय घेतलेला आहे. सदर निर्णयास अनुसरुन दिपावली सणाकरीता आडसाली ऊसाकरीता प्र.मे.टन रक्कम रु.१००/-, पुर्व हंगामी ऊसाकरीता रु.१७५/- व सुरु व खोडवा ऊसाकरीता रक्कम रु.२००/- याप्रमाणे ऊसबील सभासदांच्या खात्यावर दिपावली सणा अगोदर वर्ग करणेत येणार आहे. या ऊस बीलाबरोबरच सभासदांच्या ठेवीवरील व्याज देखिल दिपावलीपुर्वी सभासदांच्या खात्यावर वर्ग करणेचा निर्णय संचालक मंडळाने घेतलेला आहे. तसेच कारखाना कायम व हंगामी कामगारांसाठी दिपावलीकरीता १५टक्के अॅडव्हान्स बोनस देणेचा निर्णय घेणेत आलेला आहे.
तसेच कारखान्याचा गाळप हंगाम सन २०२०-२०२१ दि.२७/१०/२०२० रोजी सुरु झाला असून आजअखेर २८,४८४ मे.टन ऊसाचे गाळप होवून २२,१०० क्विंटल साखर उत्पादित झालेली आहे. चालु गळीत
हंगामाकरीता कार्यक्षेत्रामध्ये ३२,९४९ एकर क्षेत्रावर ऊस लागवड झालेली असून त्यापासून अंदाजे १२.५० लाख मे.टन इतका ऊस गाळपासाठी उपलब्ध होईल असा अंदाज आहे. तसेच गाळप हंगाम २०२१-२०२२ करीता आजअखेर २१७४० एकर ऊस लागवडीची नोंद झालेली आहे. तरी २०२०२०२१ हा गळीत हंगाम सुरळीतपणे पार पाडणेसाठी गतवर्षीप्रमाणे सर्व सभासदांनी
सहकार्य करावे असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी
केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!