सोमेश्वर

सोमेश्वरनगर बारामती येथिल कार्तकर्त्याने केला देवेंद्र फडणविस यांच्या पुतण्याचा पर्दा फाश… खोटी माहिती देऊन घेतली लस !…

बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर इथले माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी याबाबत माहिती मागवली होती.

सोमेश्वरनगर बारामती येथिल कार्तकर्त्याने केला देवेंद्र फडणविस यांच्या पुतण्याचा पर्दा फाश…
खोटी माहिती देऊन घेतली लस !…

देवेंद्र फडणवीसांच्या पुतण्याने आरोग्य कर्मचारी म्हणून घेतली कोरोना लस, माहिती अधिकारातून उघड!

बारामती वार्तापत्र रिपोर्ट

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या 25 वर्षीय पुतण्याने वयाचे निकष पूर्ण होण्याआधीच कोरोना लस घेतल्यामुळे सोशल मीडियावर प्रश्नांचं वादळ उठलं होतं. 1 मे पासून 18 वर्षावरील नागरिकांना कोरोनाची लस देण्यास सुरुवात झाली. मात्र, त्यापूर्वीच पंचविशीतील तरुणाला लस कशी मिळाली? असा सवाल विरोधकांकडून त्यावेळी विचारण्यात येत होता. या मुद्द्यावरुन देवेंद्र फडणवीसांवरही जोरदार टीका झाली. दरम्यान, फडणविसांसोबत पुतण्याचं नातं असलेल्या तन्मनने आरोग्य कर्मचारी असल्याचं सांगत कोरोनाची लस घेतल्याचं माहिती अधिकारातून उघड झालं आहे.

तन्मय फडणवीस याने आरोग्य कर्मचारी असल्याचं भासवून कोरोना प्रतिबंधक लस घेतली. त्याने लसीकरणापूर्वी आपण आरोग्य कर्मचारी असल्याची नोंदणी केली, अशी माहिती माहिती अधिकारातून समोर आली आहे. बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर इथले माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी याबाबत माहिती मागवली होती. त्यांना मिळालेल्या माहितीनुसार तन्मय याने आरोग्य कर्मचारी असल्याचं भासवत कोरोना लस टोचून घेतली आहे. प्रत्यक्षात तन्मय फडणवीस याच्या ट्विटर फ्रोफाईलवर अभिनेता असा उल्लेख आहे.

फडणवीस काय म्हणाले होते?

तन्मय फडणवीस आपला दूरचा नातेवाईक आहे, असं म्हणत विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत हात झटकले होते. तन्मय फडणवीस याने नियम तोडून लस कशी घेतली, हे आपल्याला माहित नसल्याच स्पष्टीकरण फडणवीसांनी दिलं होतं. तन्मय अभिजीत फडणवीसच्या बाबतीत मी लेखी निवेदन दिलं आहे. त्यापेक्षा अधिक बोलण्याची गरज नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

अमृता फडणवीस यांचे ट्वीट काय?

अमृता फडणवीस यांनीही तन्मय प्रकरणावर ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली होती. “कोणत्याही सेवेची प्राथमिकता ही शिष्टाचार किंवा प्रचलित धोरणाच्या आधारे असावी. नियम आणि कायद्याच्या वर कोणीही नाही. कायदा आपले काम करु शकतो आणि आम्ही नेहमीच न्यायासाठी उभे आहोत! आम्ही या विषयावर आपल्यासोबत आहोत. कृपया भविष्यात रांगा तोडण्याचे प्रकार थांबवण्यासाठी योग्य कृती करा!” असे संदिग्ध ट्वीट अमृता फडणवीस यांनी केलं होतं.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!